आॅनलाईन प्रवेश प्रक्रीयेत आरक्षणातील विद्यार्थ्यांना प्रमाणपञासाठी सवलत मीळावी - राजकुमार डाके यांची ना.मुंडे यांच्याकडे मागणी
परळी (प्रतिनीधी) -: सध्या विविध विभागांची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे व त्यांच्या मुदती पण लवकरच संपत असताना ओबीसी संवर्गासह इतर संवर्गातील विद्यार्थ्यांना कोरोना महामारीच्या काळात लाॅकडाउन मुळे जातीचे दाखले, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, उत्पंन्नाचा दाखला मिळण्यास उशीर होत आहे. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया वेळी ऑनलाइन फॉर्म भरताना लागणार्या विविध दाखल्यांसाठी सवलत देण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे सामाजीक न्यायमंञी मा.ना.धनंजय मुंडे यांच्याकडे राष्ट्रवादी काॅग्रेस ओबीसी विभागाचे तालुकाध्यक्ष राजकुमार डाके यांच्यावतीने करण्यात आली आहे.
नुकतेच सर्व शैक्षणीक सञातील नीकाल लागले आसुन उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पुढील वर्गासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रीया सुरु आहेत सध्याच्या कोरोना महामारीच्या संकटामुळे आॅनलाइन फॉर्म भरताना सर्टिफिकेटस अपलोड केल्याशिवाय फॉर्म सबमिट होत नाही. व सध्या लाॅकडाउन सुरु आसल्यामुळे सर्टफीकेट मीळण्यास उशीर होत आहे. व बर्याच ठीकाणची प्रवेश प्रक्रीयेची शेवटची तारीख जवळ आली असल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासुन वंचीत राहण्याची शक्यता आहे विशेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर याचा विपरीत परिणाम होउन ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासुन वंचीत राहाण्याची शक्यता असल्याने यापुढे सर्व आरक्षीत जागेवरील प्रवेश प्रक्रीयेतील विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश प्रक्रीयेत प्रमाणपञासाठी सवलत देउन त्यांचे प्रवेश अर्ज आॅनलाई सबमीट करुण घेण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे सामाजीक न्यायमंञी मा.ना.धनंजय मुंडे यांच्याकडे राष्ट्रवादी काॅग्रेस ओबीसी विभागाचे तालुकाध्यक्ष राजकुमार डाके यांच्या वतीने करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment