धुळ्यात लॉक डाऊनला विरोध, व्यापाऱ्यांनी दिला प्रतिसाद


धुळे,दि.१ - सर्वसामान्य लोकांनी आता जगायला सुरवात करावी. असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद मध्ये केले होते. त्यांच्या आवाहनाला आज धुळे  वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रतिसाद देण्यात आला. शहरातील दुकानदारांना आवाहन करण्यात आले जगायचं असेल तर आपले सर्व व्यवसाय सुरू ठेवावे लागतील हे सरकार भांडवलदारांचे सरकार असून या सरकारला तुमच्याशी काही देणे घेणे नाही. 

स्वतःला   सिद्ध करावे लागेल मुलाबाळांसाठी घराबाहेर पडा लहान-मोठे व्यवसाय सुरू करा. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यानी सर्वांना बाळासाहेबांची भूमिका समजावून सांगितले. त्यामुळे अनेक भागात व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद देत आपापली दुकाने उघडी केली.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला