माळेगांव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबनेचा जाहीर निषेध आरोपीला कठोर शासन करा सम्राट अशोक विचार मंचने केली मागणी
परळी (प्रतिनिधी) -: मौजे माळेगांव ता. लोहा जिल्हा नांदेड येथील विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याची दि.५ रोजी काही समाजकंटकांनी विटंबना केली.
या घटनेचा निषेध परळी येथून माननीय मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आला परळी उपविभगिया कार्यालयामार्फत मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले
अशा घटना गेली अनेक दिवसापासून घडत आहेत असे अनुचित प्रकार पुन्हा पुन्हा घडू नये म्हणून जातीवादी आरोपींना कडक शासन करावे अशी मागणी दि.०७/०८/२०२० रोजी सम्राट अशोक विचार मंच यांच्या वतीने करण्यात आली.
व महाराष्ट्र घरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या प्रांगणात सी.सी. टीव्ही कॅमेरा बसवावे अशीही मागणी करण्यात आली यावेळी निवेदन देताना सुभाष वाघमारे, प्रा.दासू वाघमारे, शिवाजी बनसोडे,बी.ए. वडमारे,अशोक वाघमारे, भीमराव गोदाम, धोंडीराम वाघमारे, आर.एस.दहीवाडे, सहदेव कांबळे, विष्णू खंदारे आदींनी या निवेदनावर स्वाक्षरी केली होती
Comments
Post a Comment