नव्या पिढीने आण्णाभाऊ साठे यांचे विचार अंगीकरावेत - माधवराव ताटे
परळी वै.(प्रतिनिधी) :- साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे जीवन म्हणजे एक संघर्ष होता. समाजातील दिनदुबळ्यांचा आवाज आण्णाभाऊ यांनी आपल्या कथा कविता कांदबरी नाट्य प्रवास वर्णनने यातून मांडला आण्णाभाऊंचे समाज प्रबोधनाचे हे विचार नव्या पिढीने अंगीकरावेत असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते माधवराव ताटे यांनी केले. ते सिध्दार्थ नगर येथे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
ञिशरण बौद्ध विहार कमिटीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध अँड. दिलीप उजगरे, माधवराव ताटे, यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर माधवराव ताटे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्य रानबा गायकवाड, मातंग समाजाचे नेते डी.जी.मस्के, राजकुमार हजारे, वंचित बहुजन आघाडीचे गौतम साळवे, कैलास तरकसे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. कोरोनाच्या नियंमाचे पालन करण्यात आले.
Comments
Post a Comment