बीड जिल्ह्यात बार्टी कडून अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त ऑनलाईन प्रबोधन कार्यक्रम संपन्न
माजलगाव (प्रतिनिधी) -: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती शताब्दी महोत्सव वर्षा निमित्ताने आयोजित कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून झूम अँपच्या माध्यमातून 2 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे नामवंत अभ्यासक, संशोधक, तसेच त्यांच्या विचारांचा चळवळीतून पुढे वारसा चालवणारे सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे ऑनलाईन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आयोजन करण्यात आले होते.
प्रथम सत्रात 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनकार्य व योगदान' कल्याणासाठी त्यांचे विचार कार्य व साहित्य या विषयावर श्रीहरी कांबळे यांनी प्रबोधन केले व सुत्रसंचालन समतादुत ढगे ज्ञानेश्वर (ता. माजलगाव) यांनी केले त्यावेळीत्यावेळी सय्यद दिलावर सर प्रकल्प अधिकारी बार्टी मुख्यालय पुणे. व अध्यक्ष स्थानी मा.पंचायत समिती सभापती नरवडे जयदत्त व सरपंच नरवडे संजय हे ही उपस्थित होते व त्याच बरोबर व्याख्यान ऐकण्यासाठी मेटे श्रीकृष्ण, सुमित धिरडे, शहादेव ढगे ,तुषार ढगे,महादेव साळुंके, करण थोरात सर, पार्थ ढगे , महादेव धिरडे आदि तसेच परळी तालुक्यातील (रिपोर्टर)पत्रकार सय्यद सर यांची हि उपस्थित होते.
मा. ना. धनंजय मुंडे (सामाजिक न्याय व विशेष सहा. विभाग, मंत्री महाराष्ट्र राज्य), मा. ना. विश्वजित कदम (सामाजिक न्याय व विशेष सहा. विभाग, राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य), पराग जैन - नैनुटीया (भाप्रसे) (प्रधान सचिव सामाजिक न्याय व विशेष सहा. विभाग), कैलास कणसे (महासंचालक बार्टी, पुणे), यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीमती प्रज्ञा वाघमारे (मुख्य प्रकल्पसंचालिका समतादूत विभाग बार्टी,पुणे) यांच्या संकल्पनेतून ऑनलाईन माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती शताब्दी निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बीड जिल्हा प्रकल्प अधिकारी सर्वेश्वर कोठूळे समतादूत ढगे ज्ञानेश्वर, अमोल तांदळे, संजय गुजर, मधुसुदन मस्के, प्रदीप गुजर, रवींद्र नांदे, तुकाराम शेवाळे, ज्ञानोबा मात्रे , नानाभाऊ गव्हाणे, भीमा कानधरे, सय्यद अखेब, पुरुषोत्तम स्वामी, व्यंकटेश जोशी, श्रीमती वर्षा देशमुख, आदींसह नामवंत मान्यवर ऑनलाईन प्रबोधन कार्यक्रमात सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment