मधुकर इंगळे यांचे अपघाती निधन
परळी (प्रतिनिधी) -: पांगरी कॅम्प येथील रहिवासी मधुकर रंगनाथ इंगळे (वय ५५ वर्षे) यांचे मंगळवार दि.४ रोजी परळी सिरसाळा रोडवरील गजान फॅक्टरी नजीक अपघाती निधन झाल्याने पांगरी कॅम्प परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पांगरी कॅम्प येथील रहिवासी व फूल उत्पादक शेतकरी असलेले मधुकर रंगनाथ इंगळे (वय ५५ वर्षे) हे गावातीलच एक जणांसोबत परळी येथे ॲडमिट असलेल्या गावातील रुग्णास भेटण्यासाठी गेले होते. मंगळवार दि.४ रोजी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान ते परत आपल्या गावी येत असतांना त्यांची मोटरसायकल गजानन फॅक्टरी नजीक अचानक स्लिप झाल्याने दोघांनाही गंभीर मार लागला होता. त्यांना तातडीने परळी येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले असता मधुकर इंगळे यांच्या डोक्याला मार लागून अति रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर बुधवार दि.५ रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान पांगरी येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मधुकर इंगळे हे पांगरी व परिसरात बापू या नावाने परिचित होते.
ते एक प्रगतशील फूल उत्पादक शेतकरी होते.अडचणीत असलेल्यांसाठी ते सदैव मदतीला धावून जात असत.कायम हसत मुख,सर्वांशी मिळून मिसळून राहणे,धार्मिक वृत्ती यामुळे ते पंचक्रोशीत अत्यंत परिचित होते.त्यांच्या अपघाती निधनामुळे गाव परिसर व पंचक्रोशीत हळ-हळ व्यक्त केली जात आहे.मधुकर इंगळे यांना पत्नी,दोन मुली,पांडुरंग व अशोक हे दोन मुले सुना नातवंडे असा भरगच्च परिवार आहे त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात दक्ष न्युज परिवार सहभागी आहे.
आज रक्षा विधी
मधुकर इंगळे यांचा रक्षा विधी पांगरी येथील स्मशानभूमीत आज गुरुवार दिनांक ६ रोजी सकाळी सात वाजता होणार आहे.
Comments
Post a Comment