मिलिंद विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
परळी (प्रतिनिधी) -: एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत शाळेतून प्रथम तीन आलेल्या कु. यशश्री सिद्धेश्वर रनखांबे, कु. वैष्णवी परशुराम गित्ते व कु. विशाखा विश्वास रोडे या विद्यार्थीनींचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री. पवार के.एन. , पर्यवेक्षक श्री कोम्मावार आर.जी. , वरीष्ठ शिक्षक श्री. कांबळे वसंत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री पवार सर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या महामारीच्या काळात विद्यार्थ्यांच्या सत्काराचा मोठा कार्यक्रम ईच्छा असूनही घेता येऊ शकत नाही याबाबत शाळेचे पर्यवेक्षक श्री. कोम्मावार सर यांनी बोलताना खंत व्यक्त केली. जेष्ठ शिक्षक श्री. कांबळे सर यांनी विद्यार्थ्यांचे त्यांच्या यशाबद्दल कौतुक केले. विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश म्हणजे विद्यार्थी, पालक व शिक्षक या तिघांच्या परिश्रमाचे फलीत आहे असेही यावेळी बोलताना ते म्हणाले. या कार्यक्रमा प्रसंगी जेष्ठ शिक्षक श्री. लोणीकर सर, दराडे सर, नाकाडे मॅडम, कोम्मावार मॅडम, बनसोडे मॅडम, काटकर मॅडम, पालक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष माननीय अॅडव्होकेट अनंतराव जगतकर साहेब यांनी भ्रमणध्वनीवर विद्यार्थी,पालकांना शुभेच्छा कळविल्या.
Comments
Post a Comment