कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटनेची मराठवाडा विभागीय वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न ऑनलाईन सभेला मोठा प्रतिसाद; सातवा वेतन आयोग लागू करा


औरंगाबाद (प्रतिनिधी) -: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटना सलग्न भारतीय कामगार कर्मचारी महासंघ  या संघटनेची मराठवाडा  विभागाची  वार्षिक सर्वसाधारण सभा  शनिवारी  उत्साहात संपन्न झाली. मुंबई येथील  संघटनेचे सरचिटणीस अनंत जगताप यांच्या अध्यक्षततेखाली तसेच औरंगाबाद विभागाचे उपाध्यक्ष फेरोज खान यांच्या उपस्थितीत ऑनलाईन सभा झाली. सभेला मराठवाड्यातील सदस्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. औरंगाबाद विभागात संघटना मजबूत करणे व सभासद वाढविणे, मंडळाच्या कर्मचाऱ्यांना  ७ वा वेतन आयोग लागू करणे,
अर्धवेळ कर्मचार्यांच्या समस्या सोडविणे,
मेडिक्लेम योजनेत आई-वडिलांचा समावेश  करणे, सेवाजेष्ठता यादीनुसार पदोन्नती देणे,
बंद करण्यात आलेले २२ कामगार कल्याण केंद्रे सुरू करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.  
संघटनेचे सरचिटणीस अनंत जगताप यांनी अध्यक्षीय समारोपात मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन व मंडळ प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी म्हणाले. तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी  मंडळातील प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर रहावे, असे  आवाहन  यावेळी अनंत जगताप केले. सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांची सभेला उपस्थित होती.
यावेळी गजेंद्र आहेर, राजेंद्र नांद्रे, नरेश पाटील, सुरेश अवचार, नागेश कल्याणकर, संगमेश्वर जिरगे तसेच सेवानिवृत्त कर्मचारी विभागाचे  आनंदा जाधव आदींनी मार्गदर्शन केले. अफरोज अहमद, स्वप्नील मोरे, वासे अहमद, नजीरोद्दीन शेख, डी. डी. रेणुके, संतोष जाधव
यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होते.
 सुत्रसंचलन फेरोज खान यांनी केले तर आभार  विजय अहिरे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला