परळीत साडी-चोळी व धान्य देऊन स्वातंत्र्य दिन साजरा
परळी वै.(प्रतिनिधी) -: ७४ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून परळी येथील इनरव्हील क्लब तर्फे विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले.एक आदर्श महिला सरपंच म्हणून मौजे नंदागौळ च्या सरपंच सौ पल्लवीताई सुंदरराव गित्ते यांचा सत्कार क्लबच्या प्रेसिडेंट सौ शोभना सौंदळे व क्लब एडिटर सौ उमा समशेट्टे यांच्या हस्ते झाले. तसेच शहरातील एक मतिमंद महिला सौ प्रयाग बाई मुंडे यांना इनरव्हील क्लब तर्फे साडीचोळी व धान्य देऊन सहाय्य करण्यात आले त्याशिवाय येथील प्रेम पन्ना नगर वसाहतीमध्ये वृक्षारोपण देखील करण्यात आले .
Comments
Post a Comment