औ.वि.केद्रं चंद्रपूर येथे चालू असलेल्या आंदोलनाला परळी तून पाठिंबा
परळी (प्रतिनिधी) -: चंद्रपूर येथील थर्मल पावर स्टेशन येथे आज सकाळपासून आंदोलन चालू आहे थर्मल च्या चिमणी वर जाऊन आत्महत्येचा इशारा देत महिला व पुरुष आंदोलन करत आहेत
औष्णिक विद्युत केंद्रतील जागेत शेती गेली असून प्रशासनाने त्यांना नोकरीचे आश्वासन दिले होते परंतु त्यांना अद्यापही नोकरीवर घेतले नाही म्हणून प्रशासनाला आत्महत्येचा इशारा दिला आहे आज सकाळपासून हे आंदोलन चालू असून रात्रीसुद्धा आंदोलन चालूच आहे.
या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी कृती समिती परळी वतीने या आंदोलनाला पाठिंबा देऊन व परळी येथेही आंदोलन चालू केली आहेत
Comments
Post a Comment