वंचित बहुजन आघाडी व भारीप बहुजन महासंघ हडपसर मतदारसंघाच्या वतीने हडपसर डेपो समोर राज्य सरकारच्या विरोधात डफली बजाव आंदोलन
पुणे (प्रतिनिधी) -: राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे सामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एसटी, बेस्ट आणि इतर सार्वजनिक वाहतूक सुविधा बंद असल्याने सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील लॉकडाऊन उठवावे अन्यथा राज्य सरकारच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभर दफली बजाव आंदोलन करण्याचा इशारा दिला त्या अनुषंगाने आज दुपारी 12 वाजताच्या दरम्यान पुणे हडपसर विभागात पक्षाच्या वतीने डेपो च्या समोर दफली बजाव आंदोलन करण्यात आले व संबंधित हडपसर विभागाचे प्रमुख यांस निवेदन सादर केले यावेळी उपस्थित हडपसर विधानसभा अध्यक्ष मा.पितांबर धिवार ,युवा नेते नवनीत अहिरे, जेष्ठ नेते दादासाहेब गायकवाड, भीमराव गोरे, मधुकर आरते, हरी वाघमारे देवानंद शिंदे ,विजयकुमार धनारिया, विनोद शिंदे ,दादासाहेब गायकवाड, श्रीदर जाधव अविनाश गोरे,योगेश अवचरे, संजय पवळ, इत्यादी उपस्थित होते
Comments
Post a Comment