संगम येथे विठ्ठल पशुखाद्य दुकानाचे ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते उदघाटन
परळी वै. (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मौजे संगम व परिसरातील शेतकऱ्यांच्या सोईसाठी सुनील कारभारी लाड यांनी विठ्ठल पशुखाद्य दुकानाच्या माध्यमातून गावातच उपलब्ध करून दिले. या पशुखाद्यचे उद्घाटन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते शानदार शुभारंभ करण्यात आले.
तालुक्यातील संगम येथे आज रविवार, दि.09.आँगस्ट रोजी सुनील लाड यांच्या विठ्ठल पशुखाद्याचा होलसेल दुकानाचा शुभारंभ डाॅ. यशवंत लाड यांच्या हस्ते पुजा करून करण्यात आले. यावेळी ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी श्रीफळ वाढवून थाटात उद्घाटन करण्यात आले. सध्या कोरोना पार्श्वभूमीवर सर्व नियंमाचे पालन करत हा समारंभ पार पाडला. डॉ.यशवंत लाड,व ह.भ.प.कोकाटे महाराज यांच्या दीप्रज्वलंन करण्यात आले. याप्रसंगी भास्कर नागरगोजे, पोलीस पाटील पांडुरंग रोडे, नकुल लाड, मुकुल लाड, राजेश गित्ते वाघबेट, भास्कर भांगे व शेतकरी बांधव उपस्थित होते.
दरम्यान ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे म्हणाले की, शेतकऱ्यांना पशुखाद्य आणण्यासाठी शहरात यावे लागत होते. सुनील लाड यांनी शेतकऱ्यांना शहराकडे न जाता आता गावातच पशुखाद्य उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांचा पैसा व वेळ वाचला आहे. यामुळे शेतकरी आनंदीत झाले आहेत. परळी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी या विठ्ठल पशुखाद्य दुकानास भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. संगम व परीसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात त्यामुळे शेतकऱ्यांनी शहराकडे न जाता विठ्ठल पशुखाद्य होल सेल व ठोक माल घेऊन जावा व संपर्क करावा मो.नं.9765555933 या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन लाड यांनी केले आहे.
Comments
Post a Comment