महिला पत्रकार सुकेशनी नाईकवाडे यांना पब्लीक प्लेस मध्ये अपमानजनक वागणूक व अरेरावीची भाषा करणाऱ्या पोलीस निरीक्षक परळी शहर कदम विरुद्ध चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी या मागणीचे - संपादक पत्रकारांचे निवेदन. निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.
बीड (प्रतिनिधी) -: परळी येथील महिला पत्रकार एच. डब्ल्यू. न्यूज नेटवर्कच्या बीड जिल्हा प्रतिनिधी व कॅमेरा पर्सन संजीव रॉय या दोघांना परळी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कदम यांच्या कडून वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जात आहे, यापूर्वीही तिन वेळा असाच प्रकार घडला आहे, यापूर्वीही आपल्याकडे याबाबद तक्रारी करण्यात आल्या आहेत.
राम जन्मभूमी भूमिपूजनाच्या दिवशी एच. डब्ल्यू नेटवर्कच्या जिल्हा प्रतिनिधी श्रीमती सुकेशनी नाईकवाडे व कॅमेरा मन संजीव रॉय हे शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर वार्तांकन करण्यासाठी गेले होते.मात्र त्यांना बाहेरूनच हाकलून देण्यात आले, त्यांना माहिती द्यायची सोडून पी.आय. कदम यांनी त्यांना त्या ठिकाणाहून हाकलून दिले व अपमानास्पद वागणूक दिली, हो याही अगोदर बातम्यांचे वार्तांकन करायला गेलेल्या या पत्रकार जोडीला पोलीस कर्मचाऱ्यां मार्फत या दोघांना पोलीस स्टेशनच्या आवारात निघुन जावं आशे आदेश दिले, पुना परत ठाण्यात यायचे नाही अशी तंबी दिली, अशा सूचना कर्मचाऱ्यांनी त्यांना ठाण्यातुन हाकलून देण्यात आले. एका प्रकरणात डी,वाय,एस,पी धस साहेब परळी येथे आले होते, बिझी आहेत असं सांगून तीन तासाच्या ठाण्यात बसून घेतलं व त्यांना भेटायचं होतं परंतु पोलीस निरीक्षक कदम यांनी जाणीवपूर्वक धस साहेबांची भेट होऊ दिली नाही. व पब्लिक प्लेस मध्ये अपमानास्पद वागणूक देऊन महिलांना पोलिसांमार्फत ,कदम पोलीस निरीक्षक परळी शहर यांनी ठाण्याच्या बाहेर काढून दिले.
हा प्रकार दोन-तीन वेळेस पडला आहे तरी आपण या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित मुजोर पोलीस निरिक्षक कदम यांची उच्चस्तरीय चौकशी करून, निलंबित करावे व योग्य कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून बीड येथील संपादक, पत्रकार, मीडिया प्रतिनिधी यांच्या वतीने करण्यात येत आहे.
वैभव स्वामी, नागनाथ जाधव, नितेश उपाध््ये,
बालाजी जगतकर,भागवत वैद्य, नितीन जोगदंड, चंद्रकांत कांबळे, विश्वनाथ शरणागत, ज्ञानेश्वर कवठेकर आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment