रानावनात जंगलात फिरवून शिकारी करणारा आदीवासी समाजाचा किशोर भोसले झाला दहावी पास
बीड (प्रतिनिधी) -: जन्मतात यांच्यावर गुन्हेगार म्हणून शिक्का मारलेला असतो असा हा आदिवासी पारधी समाज तो गेल्या कित्येक दशकांपासून एक गुन्हेगार म्हणुन आपले जीवन व्यतीत करतो तरी अशा पारधी समाजाच्या एका तरुण मुलाने आपल्या घरामध्ये अठराविश्व दारिद्र्य असताना आई वडील भिक मागणे आणि शिकार हा जगण्याचा मार्ग अवलंबत असताना भीक मागून जगणं असामुळे शिक्षणाचं खूप मोठे संकट उभे राहिले अशा वेळी आदिवासी समीकरण या संस्थेचे संचालक सुधीर भोसले यांच्याशी त्याचा संपर्क झाला आणि त्याच्या जीवनाला नवी कलाटणी मिळाली लहानपणापासून हातामध्ये वाटी घेऊन भीक मागणारा हा किशोर जेव्हा हातामध्ये पाटी आणि पेनशिल घेतले तेव्हा तो खूप आत्मविश्वासाने अक्षरे गिरवू लागला आणि मनामध्ये लहानपणी त्याने शिकून मोठा अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्या माध्यमातून त्याने खूप अभ्यासामध्ये परिश्रम घेतले आणि या परिश्रमाला साथ दिली ती आदिवासी समीकरण या संस्थेचे संचालक सुधीर भोसले यांनी यांच्या माध्यमातून किशोर ला शैक्षणिक साहित्य तसेच खाण्यापिण्याची राहण्याची सोय निर्माण झाली आणि बीड सारख्या ठिकाणी त्याला शिक्षण घेन सोपं झालं विवेकानंद विद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना अभ्यासाकडे लक्ष देऊन गेल्यावर्षी दहावीला असताना खूप परिश्रम घेतले आणि जोगेश्वरी विद्यालय मधून त्याने 75 टक्के मार्क घेऊन तो आता पास झाला आहे, पण आता त्याच्यापुढे पुढील शिक्षण घेण्याचा मोठा प्रश्नच निर्माण झाला आहे त्याला पुढील शिक्षण घेण्यासाठी त्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने किशोर भोसलेच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाचे जबाबदारी आपल्या माध्यमातून आदिवासी समीकरण अनाथ सेवा प्रकल्प बीड यांनी घेतली आहे
त्याला शिकून खूप मोठं होण्याचं त्याचे स्वप्न आहे या त्याच्या स्वप्नांना भरारी देण्यासाठी हवा आहे तुमचा मदतीचा हात
संपर्क मो,9372982344
सुधीर भोसले
प्रकल्प संचालक आदिवासी समीकरणाच अनाथ सेवा प्रकल्प वासनवाडी बीड .
Comments
Post a Comment