प्रशासनाची दडपशाही परभणीत अनेक कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात


परभणी,दि,१२ - राज्यातील एसटी तसेच शहरांतर्गत चालणाऱ्या बस सेवा सुरळीत करण्यात याव्यात या मागणीसाठी राज्यभर डफली वाजवत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. मात्र परभणीत आंदोलनाला सुरुवात होता असतानाच अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले ही एक प्रकारे प्रशासनाची दडपशाही असून या घटनेचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध करण्यात येत आहे. परभणी शहरात काल रात्री पासूनच पोलिसांनी आपली दडपशाही दाखवण्यास सुरुवात केली. अनेक कार्यकर्त्यांना 149 नुसार नोटीस देण्यात आली.ही नोटीस घेण्यास अनेक कार्यकर्ते तयार नसताना त्यांना पोलीस स्टेशन मध्ये बोलवून अगदी दमदाटी,जबरदस्ती करीत नोटीस घ्यायला भाग पाडले. त्यानंतर त्यांना आंदोलन केल्यास आम्ही कठोर कारवाई करू असे सांगितले. त्यानुसार आज सकाळी पोलिसांनी कारवाईला सुरुवात करीत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते या आंदोलनात उतरले आहेत मात्र सामान्य नागरिकांचे प्रश्न आता मांडायचे की नाही असा प्रश्न प्रशासनाच्या या दडपशाहीमुळे पडला आहे.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला