कोरोनाच्या संकटामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचा निर्णय
परळी (दि. ८) - : बीड जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रावर कोरोनाच्या संकटाचे सावट आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या ११ ऑगस्ट रोजी असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
यावर्षी कोरोनामुळे सर्वत्र परिस्थिती गंभीर असून परळी शहर देखील कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या परिणामांना सामोरे जात आहे.त्यामुळे सर्वांची सुरक्षा जास्त महत्वाची आहे. सर्वांच्या शुभेच्छा - आशीर्वाद मला लढण्याचे बळ देतात, परंतु यावर्षी कोरोनाशी लढण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर असून, त्यासाठी आपण सर्वांनी सुरक्षित राहणे गरजेचे आहे. सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद माझ्या सोबत आहेतच. स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, कोरोनाला बीड जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातून कायमचे हद्दपार करण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करुयात, याच माझ्यासाठी यावर्षीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील असेही बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.
Comments
Post a Comment