गणेश मंडळांनी शासनाचे नियम पाळावेत व कोरोनाबद्दल जनजागृतीही करावी-पो.नि.हेमंत कदममाणिक नगर गणेश मंडळाच्या जनजागृती फ्लेक्स चे मान्यवरांच्या हस्ते अनावरण


परळी l प्रतिनिधी -: कोरोना महामारीचे संकट अवघ्या जगावर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची साखळी तुटावी यासाठी शासनाच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आले आहे. गणेशोत्सव हा आपल्याकडील पारंपारिक लोकोत्सव जवळ येतोय. या पार्श्वभूमीवर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गणेश मंडळांनी शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळावेत व जास्तीत जास्त जनजागृती कशी करता येईल याकडे लक्ष द्यावे असे आवाहन परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी केले. माणिक नगर येथील गणेश मंडळाने जनजागृतीपर छापलेल्या फ्लेक्स चे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले.

माणिकनगर गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम गणेशोत्सव काळात राबविण्यात येतात. यंदा मात्र गणेशोत्सवावरसुद्धा कोरोनाचे संकट आले आहे. या कालावधीत कोरोनाने घाबरलेल्या नागरिकांत योग्य गोष्टींची जनजागृती करणे आवश्यक आहे हे लक्षात घेता माणिकनगर गणेश मंडळाने माहितीपूर्ण फ्लेक्स तयार केले आहेत. या आजाराला दूर ठेवण्यासाठी मास्क वापरा, सॅनिटायझरचा बाहेर निघतांना वापर करा, सोशल डिस्टनसिंग ठेवा, गर्दी करू नका, घराबाहेर विनाकारण पडू नका, पोलिस, डॉक्टर व प्रशासनाला सहकार्य करा अशा आशयाची जनजागृती करणारे फ्लेक्स छापण्यात आले आहेत. पो.नि.हेमंत कदम यांच्या हस्ते याचे अनावरण करण्यात आले. यावेळी पत्रकार दत्तात्रय काळे, युवक नेते शाम गडेकर, माणिकनगर गणेश मंडळाचे अध्यक्ष ईश्वर राऊत, मदन गडेकर- उपाध्यक्ष, बालाजी गर्जे- सचिव, नागेश चोपडे - कोषाध्यक्ष, नागेश चोपडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला