साहित्याच्या माध्यमातून आण्णाभाऊ यांनी उपेक्षितांचा आवाज मांडला - सतिश मुंडे


परळी वै.(प्रतिनिधी) :- साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी साहित्याच्या माध्यमातून उपेक्षित समाजाचा आवाज जगासमोर मांडला असे प्रतिपादन भाजपाचे तालुकाध्यक्ष सतिश मुंडे यांनी आज त्यांच्या जयंती निमित्त बोलतांना केले. 
    शहरातील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे चौकात त्यांच्या प्रतिमेस भाजपाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी बोलतांना सतिश मुंडे यांनी म्हणाले की, आण्णाभाऊ साठे यांचे शिक्षण जरी कमी झाले असेल तरी त्यांनी प्रचंड साहित्याची निर्मिती केली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांचे योगदान मोठे होते. यावेळी तालुकाध्यक्ष सतिश मुंडे, ज्येष्ठ नेते श्रीराम मुंडे, सुरेश माने, बळीराम गडदे, संतोष सोळंके, संजय मुंडे, चंद्रकांत देवकते,भुराज.बदने, धनंजय गित्ते, नारायण तांबडे,  गोविंद मोहेकर, अमोल वाघमारे हे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला