श्री रत्नेश्वर विद्यालय टोकवाडी चे एस एस सी परीक्षेत घवघवीत यश
परळी (प्रतिनिधी) -: इयत्ता दहावीच्या निकालाची परंपरा श्री रत्नेश्वर विद्यालय टोकवाडी च्या विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे. या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. शाळेचा निकाल 89.90%लागला आहे. या शाळेतून एकूण 109 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 98 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .यापैकी 23 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह, 53 विद्यार्थी प्रथम श्रेणीत ,17 विद्यार्थी द्वितीय श्रेणी, तर 05 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत .
शाळेतून सर्वप्रथम कु. कांगणे वैष्णवी खंडेराव (92. 40%)
सर्व दितीय कु. घाडगे सुहानी संजय (83 . 40),
सर्व तृतीय कु. मुंडे अनुराधा राजेभाऊ -(83.20%)गुण घेवून आले आहेत .
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री सोमेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव श्री ॲड. गोपाळराव कांदे सर.
शाळेचे मुख्याध्यापक श्री सिरसाट एस.पी. सर व सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment