फुले -आंबेडकरी अभ्यासक व मुक्त पञकार इंजि.भगवान साकसमुद्रे यांच्यावर प्राणघातक हल्ला
परळी वै (प्रतिनिधी) -: परळी वै.येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तथा फुले-आंबेडकरी अभ्यासक तथा मुक्त पञकार इंजि. भगवान साकसमुद्रे यांच्यावर दि ६ऑगस्ट रोजी दुपारी २:३० च्या सुमारास तलवार व लाथा बुक्याने प्राणघातक हल्ला झाला असून त्यांच्यावर सध्या स्वा.रा.ति.रूण्णालय अंबाजोगाई.येथे उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
सविस्तर वृत्त असे की इंजि. भगवान साकसमुद्रे हे दुपारी २ च्या सुमारास बाळकृष्ण रोडे चौकात त्यांचे सहकारी बापू गायकवाड,रमेश सरवदे, यांच्यासह बोलत उभे असताना भाजपा न.प.गटनेते सचिन कागदे यांनी भगवान साकसमुद्रे यांना शिवीगाळ केली व थांब तुझी बघतो म्हणत २:३० च्या सुमारास सचिन ईश्वर कागदे,राहूल ईश्वर कागदे,शरण ताटे व अन्य पाच-सहा जणांनी तलवारी व लाथा बुक्यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केला. या हल्यातून सुदैवाने ते बचावले .त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना परळी येथील जिल्हा उपरुग्णालयात दाखल केले .परंतु त्याच्यावरील गंभीर वार व खूप रक्तस्राव झाल्याने त्यांना स्वा.रा.ति.अंबाजोगाई येथे हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान हल्लेखोर सचिन ईश्वर कागदे ,राहूल ईश्वर कागदे,शरण ताटे व इतर सहा जणांवरFIR नं २५८ भादंवि ३०७,3४१,५०४,५०६,१४३,१४७,१४४, १४९,१८८आर्म्स अक्ट ४आपती व्यवस्थापन ५१ब,महाराष्ट्र कोविड विनीयम ११ अशा कलमान्वये संभाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चांद मेंढके हे करत आहेत.
दरम्यान इंजि. भगवान साकसमुद्रे हे संपूर्ण महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत त्यांच्यावरील हल्ल्यामूळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान आज या संदर्भात परळी पञकार संघाच्या वतीने संभाजीनगर पोलिसांना दुपारी निवेदन देण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment