रस्त्यावर भाकरी खाऊन वंचितने लॉकडाऊन तोडले..!


बीड,दि, १ - राज्यभरात भाजपचे आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीकडून रस्त्यावर बसून चटणी भाकर खात सरकारचा निषेध केला गेला. 

लॉकडाऊनने गोरगरिबांचं कंबरडे मोडल्याचे सांगत आजपासून शासनाचा कसलाच लॉकडाऊन पाळण्यात येणार नसल्याची शपथ यावेळी घेण्यात आली. तसेच रस्त्यावरच भाकरी खात लॉकडाऊन तोडण्यात आला. आज पासून कोणीही मास्क घालणार नाही, किंवा फिजिकल डिस्टन्स पाळणार नाही.
असे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर यांनी जाहीर केले आहे. या प्रसंगी राज्य महासचिव भीमराव दळे प्रशांत बोराडे  सम्यकचे जिल्हाध्यक्ष अजय साबळे,    बाळासाहेब वाघमारे इत्यादी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला