नांदेड पुतळा विटंबना प्रकरणात राज्यात तीव्र संताप
धुळे, दि.७ - नांदेड जिल्ह्यामध्ये माळेगाव(यात्रा) या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ आज धुळे पोलीस अधीक्षक यांना वंचित बहुजन आघाडीकडून निवेदन देण्यात आले. यावेळी गुन्हेगारांना कठोर शासन करावे त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली .
नांदेड माळेगाव या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती उभा पुतळा आहे, काल अज्ञात समाज कंटकाने बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली. याचे तीव्र पडसाद राज्यभर पडले. राज्यात अनेक ठिकाणी निषेध करून ठिकठिकाणी निवेदने देण्यात आली. धुळे जिल्यातही या घटनेचा निषेध म्हणून पोलीस अधिक्षकाना निवेदन देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे भैय्यासाहेब पारेराव व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment