वेतना अभावी सफाई कामगारांच्या कुटुंबीयाची उपासमार जिल्हयातील सर्व प्रशासकीय कार्यालया समोर आमरण उपोषण करण्याचा कामगारांचा ईशारा
परळी/बीड(प्रतिनीधी) -: मागील तीन महिने जानीवपुर्वक सफाई कामगारांचे वेतन अदा केले जात नाही.त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली असल्याने कामगारांनी घरी मरण्या पेक्षा जिल्हयातील प्रशासकीय कार्यालया समोर आमरण उपोषण करण्याचा ईशारा मा. जिल्हाअधिकारी कार्यालय,बीड यांना २७ जुलै २०२० रोजी ऐका निवेदनाद्वारे दिला होता. त्याकड़े जित्न्हाप्रशासनाचे आजिबात लक्ष नसून उलट कंत्राटी/ रोजंदारी कामगारांना काढण्याचे तोंडी आदेश दिले. जिल्हयातील सर्व मुख्याधिकारी,नगरपरिषद/ नगरपंचायत मध्ये ज्यांची सत्ता आहे, त्या सत्ताधारी आहेत त्यांचे ऐकून सावळा गोधंळ घालत आहेत. कायदा, कानून, व नियम पायदळी तुडवतात. किमान वेतना प्रमाने थकीत वेतन अदा करून,अदयावत प्रचलीत कामगार कायदयाच्या सुख सोई व अयोग्य, बे कायदेशिर कामावरून कमी केलेल्या कामगारांना दिनांक: १० ऑगस्ट २०२० पर्यन्त कामावर घेण्याचे निर्देश मा. जिल्हाअधिकारी राहूल रेखावार यांनी सर्व मुख्याधिकारी,नगरपरिषद/नगरपंचायत यांना दयावेत. अन्यथा ११ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वाजता मा. जिल्हाअघिकारी कार्यालय,बीड सह, उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालया समोर सफाई कामगार प्रतिनिधी कामगार नेते भाई गौतम आगळे यांच्या नेत्रत्वाखाली आमरण उपोषण करतील, असा ईशारा रोजंदारी मजदुर सेना जिल्हाअध्यक्षा आनिता बचुटे यांनी दिला आहे. जिल्हायातील सर्व मुख्याघिकारी,नगरपरिषद/ नगरपंचायत हे सफाई कामगारांना किमान वेतन १९४८ व महाराष्ट्र किमान वेतन नियम १९६३ या अधिनियमाअंर्तगत महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेली उद्योग,उर्जा व कामगार विभागाची अधिसुचना दिनांक: २४/ ०२/ २०१५ नुसार मुळ वेतन तसेच शासनाने वेळोवेळी ठरवलेले विशेष भत्याचे दर असे ऐकत्रीत करून कंत्राटी / रोजंदारी कामगारांना वेतन देणे बंधन कारक आहे. मुळवेतन ११५०० + ५४९५ विशेष भत्ता ऐकून १६९९५ / रुपये प्रती माह दिले पाहीजे. पंरतू परळी नगरपरिषद सफाई कामगरांना फक्त ७५०० /रुपये प्रतिमाह देतात तर बाकी ठिकानी प्रतिमाह ९००० / रुपये देतात्त. वेतन प्रदान अधिनियमानुसार मासिक वेतन प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आत देणे, व ते राष्ट्रीयकृत बँक खात्यात जमा करावे, नियम २७ प्रमाने हजेरी कम वेजस कार्ड देणे, मुख्यमालकाने कलम ७ नुसार नोंदनी दाखला घेणे इत्यादी कामगार कायदयात तरतूद आहे. हे सर्व कामगार कायदे मागील अनेक वर्षा पासून पायदळी तुडविले जात आहेत. सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्हा पालक मंत्री व मा. जिल्हाअधिकारी राहूल रेखावार व संबंधित सर्व मुख्याधिकारी या बाबत अजिबात गंभिर दिसत नाहीत. २६ जानेवारी २०२० रोजी मा. जिल्हाअधिकारी कार्यालय, बीड समोर उपरोक्त्त मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी सफाई कामगारांनी उपोषण केले होते. त्या वेळी पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्यक्ष उपोषण स्थळी भेट देवून तुमचा प्रश्न येत्या आठ दिवसात सोडविण्याचे अश्वासन दिले होते. तब्बल ०६ महिने होवुन गेले तरी अदयाप न्याय मिळाला नाही. सदरिल प्रकरणाचा अहवाल मा. निवासी उपजिल्हाअधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी ०४ फेब्रुवारी २०२० रोजी मा. जिल्हाअधिकारी कार्यालय बीड यांच्या टेबलवर ठेवला आहे. त्यांनी सुध्दा अदयाप पाहीला नाही. येत्या सोमवार पर्यन्त अहवाला नुसार कार्यवाही करून पिडीत कामगारांना न्याय दयावा, अन्यथा मंगळवार दिनांक ११ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वाजता मा. जिल्हाअधिकारी कार्यालय,बीड सह उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालया समोर सफाई कामगार प्रतिनिधी आमरण उपोषण रोजंदारी मजदुर सेना केन्द्रीय महासचिव भाई गौतम आगळे यांच्या नेत्रत्वाखाली सुरु करतील अशी माहिती प्रसिध्दी व सोशल मिडीया द्वारे संघटनेच्या जिल्हाअध्यक्षा अनिता बचुटे यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment