शेतकऱ्यांच्या पिककर्ज सह विविध मागण्यासाठी शेकाप चे अन्नत्याग आंदोलन संपन्न - भाई दत्ता प्रभाळे


बीड (प्रतिनिधी)दि.06 बीड जिल्ह्यामध्ये पिक कर्ज संदर्भात कागदपत्र च्या नावाखाली आवश्यक कागदपत्र मागून शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणामध्ये मानसिक आर्थिक पिळवणूक केली जात आहे बँकांनी सहजा सहजी शेतकऱ्यांना मदत व्हावी व चालु असलेल्या कोरोनाच्या महामारीत शेतकऱ्याची होणारी अडवणूक थांबावी यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाभर भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10 वाजल्या पासून 4 वाजेपर्यंत एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करून मुजोर बँकांचा निषेध केला आहे या, मध्ये प्रमुख मागण्या, १)शेतकऱ्यांना कुठली ही अडवणूक न करता तात्काळ पीक कर्ज वाटप करावे, २)मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊनही कर्जमाफी  मिळाली नाही अशा शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी देऊन दुसरे कर्ज वाटप करावे,
३)बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सोसायटी मार्फत शेतकऱ्यांना कर्ज तात्काळ विना अट वाटप सुरू करावी
,४)दुबार पेरणीची वेळ आलेल्या व फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना बि- बीयाणे कंपनीकडून शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी भरपाई देण्यात यावी, ५)वयोवृद्ध शेतकऱ्यांना देखील पीक कर्ज वाटप करावे ,कुटुंबातील एकत्र क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील कर्ज बँकांनी द्यावे ,६)वीज वितरण कंपनीने    लॉकडाउन काळातील चार महिन्याचे वीज बिल माफ करून वाढीव वीज बिल दुरुस्त करून द्यावेत,या मागणी साठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आज आपल्या कार्यालया समोर आन्नत्याग केलं आहे या वर शेतकऱ्याची बँके कडून होणारी अडवणूक नाही थांबली तर संबंधित बँकेला टाळ ( कुलुप ) ठोकण्यात येईल तीव्र स्वरूपाचे  आंदोलन करू याची शासन प्रशासनाने नोंद घ्यावी, आज बीड तहसीलकार्यालया समोर शेतकऱ्यांना बँकेने तात्काळ पिककर्ज द्यावे यासह विविध प्रश्नांवर शेकाप बीड तालुका कमिटी च्या वतिने अन्नत्याग आंदोलनात संपन्न यावेळी शेतकऱ्यांनी  सहभागी नोंदवला, शेकाप मध्यवर्ती कमिटी सदस्य ऍड.संग्राम तुपे,भिमराव कुटे,प्रविण गवते,भाई दत्ता प्रभाळे यांच्या सह युवक क्रांती दल जिल्हा अध्यक्ष डॉ. पंडित तुपे सर,रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्याक्ष  राम नवले पाटील,RPi चे गौतम कांबळे,भाकप चे दत्ता भोसले आदीं शेतकऱ्यांनी उपस्थित राहून  पाठींबा दर्शवला आहे.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला