मौजे लिंबुटा येथे 'सादग्राम'च्या वतीने वृक्ष लागवड
परळी,दि.१६ (प्रतिनिधी) -: तालुक्यातील मौजे लिंबुटा येथे सादग्राम निर्मिती प्रकल्प समिती,लिंबुटा या समितीच्या वतीने रविवार, दि.१६ आँगष्ट रोजी सकाळी ८.०० वा. वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. . पिंपळ,वडं,चिंच,उंबर,कारंज,पारिजातक,आपटा,आंबा,चिक्कू,नांदूरकी,आदी वृक्षारोपांची यावेळी लागवड करण्यात आली.
मौजे लिबुटा येथील एका पूर्व-दक्षीण गल्लीतील रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
गतवर्षी म्हणजेच जुलै २०१९ मध्ये गावातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा आणि देवीच्या मंदिर परिसरात १०० वृक्षरोपांची लागवड केली होती.त्यांचे आता वृक्षात रूपांतर झाले आहे.या वर्षी ग्रामपंचायत सदस्य सौ.एम.एस.मुंडे यांच्या
गल्लीतील रस्त्याच्या दुतर्फा आज हा वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
काही रोपं परळी येथील वनविभागाच्या नर्सरीतून आणण्यात आली होती तर काही समिती सदस्यांनी वर्गणी जमा करून खासगी नर्सरीतून खरेदी करण्यात आली.एकूण आज ५० वृक्षरोपं लावण्यात आली.
संत गाडगे महाराज सेवाभावी संस्था,लिंबुटा या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली व सादग्राम निर्मिती प्रकल्प समितीच्या माध्यमातून मे २०१९पासून गावाची सादग्राम निर्मितीच्या ( आदर्श गाव करण्याच्या )दिशेने वाटचाल सुरू आहे. वृक्षरोपं लागवड आणि संवर्धन हा त्याचाच एक भाग आहे.
वृक्षरोपं लागवडीसाठी "सादग्राम "समितीचे सल्लागार रामदास साहेबराव दिवटे (नाना),सदस्य मंचक रामकृष्ण मुंडे, मार्गदर्शक दगडू जयंवतराव मुंडे,सदस्य विकास ज्ञानोबा दिवटे, कार्याध्यक्ष विश्वनाथ बंकटराव मुंडे, उपाध्यक्ष विश्वांभर ज्ञानोबा दोडके,सचिव व ग्रा.प.सदस्य प्रसाद शिवराम कराड,सहसचिव इंद्रमोहन पंढरीनाथ मुंडे,संघटक विश्वनाथ पाटलोबा मुंडे,संत गाडगे महाराज सेवाभावी संस्था सचिव व "सादग्राम" समिती संस्थापक अध्यक्ष अशोक लिंबांजी मुंडे,ग्रामस्थ मधुकर शस्त्रगुण मुंडे, श्याम घुमरे, रुस्तुम जाधव,अंगद मुंजाजी नागरगोजे,अशोक मुंजाजी नागरगोजे,विष्णु पांडुरंग मुंडे,ज्ञानोबा सिताराम मुंडे,अंकुश दहिफळे आदींनी या वृक्षरोपं लागवड कार्यक्रमात आपले योगदान दिले.
Comments
Post a Comment