परळी ग्रामीण पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण संपन्न.
परळी (प्रतिनिधी) -: आज बीड पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर व डी.वाय.एस.पी. राहुल धस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पोलीस स्टेशन परळी ग्रामीण येथील परिसरात झाडे लावण्यात आले.
यामध्ये लिंबू,चिंच,जांभूळ,वड पिंपळ इत्यादी प्रकारच्या झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली असून उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस साहेब यांनी वट वृक्षाची लागवड करून या वृक्ष लागवडीचा शुभारंभ केले
या वृक्ष लागवडीच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाकडून सर्वच नागरिकांना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक मोठा संदेश देण्यात आला आहे. प्रत्येकाने एक झाड लावून ते मोठे होईपर्यंत जपले पाहिजे.
यावेळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुरवे तसेच सहाय्यक फौजदार मुंडे, बोडके, पोलीस नाईक हरीदास गीत्ते, शिवाजी गोपाळघरे, विष्णू घुले, अंबड, काकडे, महिला पोलीस शेवाळे मॅडम, ढोले मॅडम व इतर पोलिस कर्मचारी तसेच होमगार्ड देखील उपस्थित होते.
Comments
Post a Comment