नेतृत्व घडवणारे वस्ताद...
महाराष्ट्रातही जागतिकीकरणानंतर वृत्तपत्राबरोबरच विविध प्रकारची प्रसारमाध्यमे विकसित झाली.वृतपत्र व्यवसायात भांडवलदार, मोठे उद्योग समूह आल्याने,शहर जिल्हा, तालुका पातळीवर वृत्तपत्रांची संख्या वाढल्याने या क्षेत्रात काम करणार्या माध्यमकर्मींचा एक मोठा घटकच तयार झाला. लोकशाहीचा चौथा खांब म्हणून, समाजातील सर्व घटकांचे प्रश्न राजकीय व्यवस्थेसमोर मांडणार्या आणि सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी झगडणार्या माध्यम क्षेत्रालाही विविध प्रश्नांना सामोरे जावे लागते.लघु वृत्तपत्र चालकांसह, माध्यम कर्मींना तर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, पत्रकारांना मिळणारा तुटपुंजा पगार, नाममात्र मानधन यामुळे, बाहेरून असलेले या क्षेत्राचे आकर्षक प्रत्यक्षात काम करताना किती आर्थीक पातळीवर विदारक आहे याची जाणीव होते, त्यामुळे या माध्यम क्षेत्राचे प्रश्न सोडवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ असले पाहिजे,काम करणाऱ्यांना न्याय,सन्मान मिळाला पाहिजे या उद्देशाने दैनिक जनप्रवास आणि सांजमहानगरी वृत्तसमुहाचे संपादक संजय भोकरे हे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई संघटनेच्या स्थापने पासुन कार्यरत आहेत.त्यांनी शहरासह ग्रामीण भागातील पत्रकारांचे संघटन करुन एकीची वज्रमुठच तयार करत, पत्रकारांना स्व:हाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रेरीत केले. पत्रकारांची संघटना ही सक्षम असली पाहिजे यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, सांगली, अहमदनगर येथे विभागीय कार्यालयाची स्थापना करुन राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये संघटनेची स्वतंत्र कार्यालये उभी केली. राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका, शहरात पत्रकारांचे संघटन असणारी आणि माध्यम क्षेत्रातील सर्व घटकाला अडचणीच्या काळात मदत करणारी राज्य पत्रकार संघ एकमेव संघटना, झाली. राज्यस्तरावरील ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, भरतकुमार राऊत, दिनकर रायकर, सुकृत खांडेकर, किरण ठाकूर, राजीव खांडेकर, डॉ.अनिल फळे, अरविंद शिंगोटे, प्रकाश पोहरे, जयश्री खाडिलकर, विश्वास देवकर या दिग्गजांचे सल्लागार मंडळ निर्माण करुन संघटनेची विश्वासार्हता अधिक दृढ केली. संजय भोकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर, गोविंद घोळवे, राजा माने या राज्य अध्यक्षांनी आपल्या कार्यकाळात संघटनेला सर्वदूर पोहचवून संघटनेचा दबदबा निर्माण केला. संजय भोकरे यांच्या नेतृत्वाने पत्रकारांना स्वतःच्या प्रश्नांची जाणीव करुन देत ते सोडवण्यासाठी महत्वाचे योगदान दिले. दरवर्षी संघटनेचे होणारे राज्य अधिवेशने, विभागवार आणि जिल्हा पातळीवरील मेळाव्यातून पत्रकारांच्या प्रश्नांकडे सरकारचे आणि समाजाचे लक्ष वेधले. पत्रकार संरक्षण कायदा, पेन्शन योजना सरकारला मंजूर करण्यास भाग पाडले. तर पत्रकारीता क्षेत्रामधील ज्येष्ठांचा सन्मान करण्यासाठी जीवन गौरव, तरुण पत्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठीचे विविध पुरस्कार, देऊन संघटनेच्या माध्यमातून या क्षेत्राचे चांगुलपण वाढवण्यात मोठे योगदान दिले आहे. पत्रकारीतेबरोबरच कला, क्रीडा, चित्रपट, साहित्य या क्षेत्रातील मान्यवरांनाही संघाच्या वतीने सन्मानित करुन कृतज्ञता व्यक्त केली जाते. बातमी बरोबरच समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी संघटना आपली क्षमता वापरुन मदत करण्याची भूमिका घेते. तंत्रज्ञानातील वेगाने होत असलेला बदल आणि डिजीटल मिडीयाची गरज लक्षात घेऊन संजय भोकरे यांनी संघटनेच्या विभागीय कार्यालयांमध्ये अद्यावत स्टुडीओची निर्मिती करुन संघटनेला अधिक लोकाभिमुख केले आहे. संघटना अधिक सक्षम आणि विचारांचे सहज अदान प्रदान व्हावे. राज्य आणि जिल्हा, तालुका पातळीपर्यंत सर्वांशी संपर्क रहावा यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन पत्रकारांमध्ये विश्वास निर्माण करत पत्रकारांचा आवाज बुलंद केला. उपजता कुस्तीपट्टू असलेल्या संजय भोकरे यांनी सांगलीत अंबाबाई तालिम संस्थेच्या माध्यमातून अनेक मल्ल घडवले. त्यांना महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केले. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी घडवण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. तर पत्रकारीतेतही चांगले शिक्षित लोक यावेत यासाठी त्यांनी पत्रकारीतेची विविध अभ्यासक्रमाच्या माध्यमातून या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात शिक्षित पत्रकार देण्याचे कार्य चालवले आहे. क्रीडा, पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. संघटना राज्यभरात अडचणीत असलेल्या पत्रकाराला मदत करण्यासाठी, अन्यायाविरुध्द संघर्ष करण्यासाठी सतत पुढे असल्याने राज्यभरातील माध्यमकर्मींचा अवाज खर्या अर्थाने बुलंद झाला असुन पत्रकारांना आपल्या प्रश्नांची जाणीव करुन देऊन ते सोडवण्यासाठी संघर्ष आणि पाठपुरावा करण्याचे प्रोत्साहन भोकरे यांनी दिले आहे. दोन वृत्तपत्रातून आणि दुरचित्रवाहिन्यांवरील राजकीय, सामाजिक चर्चेत सातत्याने भोकरे यांनी आपला निर्भिड, निःपक्ष पणा आणि पत्रकारांच्या प्रश्नासाठी कोणत्याही व्यवस्थेशी भिडण्याची क्षमता महाराष्ट्राला दाखवून दिली आहे. दिल्ली, गोवा या राज्यातही पत्रकारांचे संघटन उभे केले आहे. तर संघटनेच्या माध्यमातून राज्यभरात क्षमता असलेल्या अनेक पत्रकारांचे नेतृत्व विकसित केल्याने माध्यम क्षेत्रात नेतृत्व घडवणारे वस्ताद ठरले.त्यामुळेच विधिमंडळ पत्रकारांचा प्रतिनिधी असावा यासाठी राज्य पाल नियुक्ती विधानपरिषद सदस्यासाठी संबंध राज्यातील पत्रकारांनमधुन एकमेव भोकरे यांच्या नावाची मागणी झाली. राज्यपालांनी संजय भोकरे यांना विधान परिषदेवर नियुक्त केले तर पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय मिळेल असा विश्वास आहे.अशा महाराष्ट्राच्या क्रीडा, पत्रकारीता क्षेत्राला समृध्द करणार्या संजय भोकरे यांना ( दि. २६ ऑगस्ट २०२०)वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!
वसंत मुंडे
प्रदेशाध्यक्ष -महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई
Comments
Post a Comment