विवेकानंद विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक सुधाकरराव गणपतराव कुलकर्णी (गुरुजी) यांचे निधन
परळी (प्रतिनिधी) -: तालुक्यातील गाडे पिंपळगाव येथील विवेकानंद विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक श्री सुधाकरराव गणपतराव कुलकर्णी (गुरुजी) यांचे अल्पशा आजाराने दि.30 /07/2020 गुरुवार रोजी लातूर येथे निधन झाले. जुन्या पिढीतील अनुभवी इंग्रजी शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती.
त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले जे आज देश विदेशात स्थायिक आहेत.
त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले व सुना , एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. गुरुजींच्या आकस्मित जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment