"गीत रमायन" प्रा.वसंतराव उगले यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन संपन्न.गीत रमायन पुस्तक पत्रकारांना भेट - प्रशांत वासनिक


बीड (प्रतिनिधी)दि.11महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर काळाला पडलेला एक सुंदर स्वप्न परंतु इतिहासात अलक्षित राहिलेत महत्व निळूभाऊ सावरगेकर यांनी या महान व्यक्तीमत्त्वांची विचार आपल्या लेखणीच्या व बुद्धीच्या जोरावर जनसामान्यात रुजण्यासाठी करत असलेल्या प्रयत्न उल्लेखनीय आहे 1957 मध्ये ग. दि. माडगुळकर, गीत-रामायण पहिल्यांदा पुस्तकरूपात प्रकाशित केलं व आकाशवाणी वर गीतांच्या माध्यमातून गीत-रामायण तोच प्रयत्न बहुजन साहित्यात पहिल्यांदा निळूभाऊ सावरगेकर गीत रमायन च्या माध्यमातून करत आहेत सावरगेकरनी गीत रमायन नामात पवीत्र पुस्तक लोकांच्या सेवेत आणले आहेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर बरेच लिखाण लेख लिहिले आहेत पण माता रमाई वर किंचितच लेखन झालेले आहे. त्यात रमावर गीत आधारित चित्र चरित्र गीतांनी नटलेले गीत रमायान यासारख्या नवीन साहित्याचे दालन दलित साहित्यात उडत असून ते अतिशय नावीन्यपूर्ण आहे आणि उल्लेखनीय कार्य आहे गीत रमायान या पुस्तकात 58 गीतांची गुंफण सोपे आणि सरळ भाषेत केली असून लोकांच्या मनाला भावणारा आहे, महामाता रमाबाई चे सहनशीलता, पतीनिष्ठा, करूण्य तथा सोशिकता ही प्रतिमा विचारा पलीकडचे आहे. अत्यंत कणखर बाणेदार शांत सद्गुणी आणि स्वाभिमानी रमाई लोकांच्या मनाच्या पटलावर तसा उमटल्याशिवाय राहणार नाही. 

 निळूभाऊ सावरगावेकरांनी आपल्या लेखणीने शब्दबद्ध केले व शब्दांना धार आली आहे, महामाता रमाबाई चे जन्मगाव व वणंदगावचे सुंदर वर्णन केले आहे आई वडील मरण पावल्यानंतर मामा-मामी,क़ाका काकु जवळ वाढलेले रमाई लग्न झाल्या नंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले माता रमाई चा वनवास कोणाच्याही वाट्याला नसणार हे सर्व निळूभाऊ सावरगेकर आपल्या गीतातून उतरले असून माणसाला अंतर्मुख करणारे हे पुस्तक एक ऑगस्ट 2020 रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने प्रकाशित झाले आहे.
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला त्यामध्ये लेखक निळूभाऊ सावरगेकर, डीएसपी चे नेते प्रशांत वासनिक, जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ विचारवंत वसंतराव ओगले, संपादक वैभव स्वामी, न्यूज 9 मराठीचे संपादक नितीन जोगदंड, पत्रकार बालाजी जगतकर, वंचित नेते संतोष जोगदंड समितीचे माजी जिल्हाध्यक्ष सदानंद वाघमारे, ज्ञानेश्वर कवठेकर, सुरेश कांबळे, शेखभाई बुकस्टॉल वाले, धम्मानंद वाघमारे, प्रकाश उजगरे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला