अण्णाभाऊंचे साहित्य शोषित पीडितांना लढण्याची प्रेरणा देणारे - अनंत इंगळे ऑनलाईन ई-मेल द्वारे ना.धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी यांना निवेदन


परळी (प्रतिनिधी) -: अण्णाभाऊंचे साहित्य शोषित पीडित समाजाला लढण्याची प्रेरणा देणारे आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे युवा नेते मा.अनंत इंगळे यांनी दि.०१ ऑगस्ट २०२० रोजी अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात जि.प.कन्या शाळा रोड परळी येथील संपर्क कार्यालयात केले. यावेळी न. प. स्वच्छता निरीक्षक श्रावण घाटे,  शिक्षक लक्ष्मण वैराळ, फुले आंबेडकरी अभ्यासक इंजि.भगवान साकसमुद्रे, रवी मुळे, दसूद सर, जतीन मस्के, धम्मा अवचार, संतोष घोडके, महेश मुंडे, ऍड. कपिल चिंदालिया, बापू गायकवाड, आकाश देवरे, जयेश बुक्तर, सतिश बारसल्ले आदी उपस्थित होते. अनंत इंगळे पुढे म्हणाले की, अण्णाभाऊंच्या साहित्यातील  नायक हा लढाऊ असून तो विषततावादी व्यवस्थेच्या विरोधात बंड करून उठतो . यावेळी भगवान साकसमुद्रे म्हणाले की, सत्यशोधक अण्णाभाऊ प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात - प्रथम मायभूमी व छत्रपती शिवबा चरणा स्मरोनिय गातो कवणा - अशी करत असत. तसेच समता, स्वातंत्र्य व मित्रत्व च्या सिद्धांतावर आधारित जगाच्या पुनर्निर्मितीसाठी जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव...हा संदेश लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिला.  यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टंसिंग चे पालन करून अण्णाभाऊंच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. तसेच ऑनलाईन ई-मेल द्वारे ना.धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी   यांना पुढील निवेदन दिले. 
सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. अण्णाभाऊ साठेंचे महाराष्ट्राच्या साहित्य, चित्रपट, सांस्कृतिक क्षेत्रात तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अतिशय मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांचा शासनस्तरावर गौरव म्हणून पुढील मागण्या मान्य कराव्यात ही विनंती. 1) अण्णाभाऊ साठेंची भारतरत्न साठी महाराष्ट्र शासनाकडून शिफारस करणे. 2) महाराष्ट्र शासनाने अण्णाभाऊ साठे निवडक वाड्.मय प्रकाशित केले आहेत. परंतु त्यामध्ये केवळ 20 कादंबर्‍याच आहेत. तेव्हा जन्मशताब्दी वर्षानिमित्त अण्णाभाऊ साठेंचे संपूर्ण समग्र वाड्.मय प्रकाशित करावे. 3) शंकरभाऊ साठेंनी लिहलेले माझा भाऊ अण्णाभाऊ हे अण्णाभाऊंचे चरित्र प्रकाशित करावे. 4) अण्णाभाऊंच्या कादंबर्‍यांवर 8 चित्रपट निघलेले आहेत. जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे सर्व चित्रपट दूरदर्शनवर दाखवावेत. 5) अण्णाभाऊंच्या कथा, काव्य हे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ठ करावे. 6) अण्णाभाऊंच्या कादंबर्‍या विद्यापीठीय अभ्यासक्रमात समाविष्ठ कराव्यात. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला