परळीत बँण्ड असोसिएशन चे शासकीय मदत मिळावी म्हणून तहसीलदारांना निवेदन


परळी (प्रतिनिधी) - : सध्या कोरोनाने थैमान घातलेला असून संपूर्ण देश हा महामारी च्या विळख्यात सापडला आहे कोरोना ने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे अशा बिकट परिस्थितीमध्ये अनेक धंद्यावर याचा वाईट परिणाम झाला आहे

व तसेच परळी तालुक्यातील बँण्ड  वादक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे या सर्वांची उपजीविका बँण्ड वरच अवलंबून असून लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, जयंती मिरवणूक, सार्वजनिक कार्यक्रम, व तसेच सांस्कृतिक कार्यक्रम हे सर्व कार्यक्रम बंद असल्यामुळे या कलाकारांचे जनजीवन विस्कळीत झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे यामुळे परळीतील बँण्ड असोसिएशन च्या वतीने परळी तहसीलदार यांना निवेदन दिले यावेळी परळी तालुका बँण्ड असोशियन चे अध्यक्ष बंडू कांबळे, उपाध्यक्ष धम्मा रोडे, कोषाध्यक्ष अभिजीत ताटे, सचिव अरुण वाघमारे, सल्लागार बाबू अवचारे, बाळू मस्के, यशपाल वाघमारे, दीपक अवचारे, महारुद्र पाचांगे, विश्वनाथ चौरे ,संदीप मुंडे, रवी कांबळे, कृष्णा चौरे, जतीन जगतकर, योगीराज चौरे
सदस्य बबन रोडे, गणेश गायकवाड, बाळू रोडे, अविनाश राजभोज, किशोर कांबळे, धम्म पैठणे, प्रदिप रोडे, रोशन भाई व तसेच परळी तालुका बँण्ड असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर