ह.भ.प.अशोक महाराज मुंडे खादगांवकर झळकले झी टॉकीजवर


परळी, (प्रतिनिधी) :- महाराष्ट्राला लाभलेल्या किर्तनपरंपरेला कानाकोपर्‍यात पोचवण्याचे काम झी-टॉकीज वरील गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रम करत आहे.परळीत असलेल्या संत जगमित्र महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिरात या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले होते. यात ह.भ.प.मृदगाचार्य अशोक महाराज मुंडे खादगांवकर झळकले आहे.
    आपल्या सुमधुर मृदगवादनामुळे सर्वदूर परिचीत असलेल्या श्री संत जनाबाई वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी ह.भ.प.मृदगाचार्य अशोक महाराज मुंडे खादगांवकर गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा कार्यक्रमात सहभाग नोंदविला.श्री ह.भ..प.शिवराज गुरूजी शिंदे यांच्याकडून  मृदगाचे शिक्षण घेतले. गजर किर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमात त्यांनी सकाळी 7 ते 9 या वेळात आत्तापर्यंत ह.भ.प.सोमनाथ महाराज कराळे पैठण, ह.भ.प.भावताचार्य अंंजलीताई केंद्रे मुंडे, ह.भ.प.अतुल महाराज शास्त्री श्रीक्षेत्र भगवानगड महंत श्री क्षेत्र भगवानबाबा संस्थान ताडगाव, ह.भ.प.सुशील महाराज गाडेकर पाटील जालना यांच्या किर्तनात मृदगसाथ केली. तसेच ह.भ.प.केशव महाराज उखळीकर, ह.भ.प.विलास महाराज बोथीकर आदींच्या किर्तनात साथ केली.या चित्रीकरणाचे प्रक्षेपण 15 ऑगस्ट 25 सप्टेंबर रोजी  झी-टॉकीज  या वाहिनीवर सकाळी 7 ते 9 यावेळेत करण्यात आले. साथ केल्याबद्दल महाराजांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला