सफाई कामगार प्रकरणी कंव्राटदार, मुख्याधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, अन्यथा आमरण उपोषण करणार - भाई गौतम आगळे


बीड(प्रतिनिधी) -: बीड जिल्हयातील सर्व नगरपरिषद/ नगरपंचायत आस्थापनेतील घनकचरा व्यवस्थापन बेकायदेशीर प्रकरणी मा.ना. मुख्यमंत्री यांच्यासह संबंधित मंत्रीमहोदय, व अधिकारी यांना ई-मेल द्वारे निवेदन १ सप्टेबंर २०२० रोजी पाठवले. त्याची दखल घेवून मा.अप्परजिल्हाअधिकारी,जिल्हाअधिकारी कार्यालय, बीड यांनी जिल्हा प्रशासन अधिकारी ( नगर विकास शाखा) यांना पत्र जा. क्र. २०२० दि.०७/०९/२०२० रोजी दोन दिवसाच्या आत सदर प्रकरणी अहवाल सादर करावा अहवाल प्राप्त न झाल्यास भविष्यात उदभवणाय्या परिणामास आपन सर्वस्वी जबाबदार असाल असे कळवले. सदरील कार्यवाही अत्यंत तुटपुंजी व असमाधानकारक असुन सफाई कामगारांना न्याय दयावा. किंवा दोषी असणारे कंताटदार, मुख्याधिकारी यांच्यावर आशिक्षीत, अज्ञाणी सफाई कामगारांना फसवून त्यांच्या वेतनाचा अपहार केला असा रितसर गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रसिद्दी पत्रका / सोशल मिडीया द्वारे कामगार नेते भाई गौतम आगळे यांनी केली आहे. येत्या दोन दिवसात कार्यवाही न केल्यास बीड जिल्हयातील सफाई कामगार मा. विभागीय आयुक्त,कार्यालय औरगांबाद समोर दिनांक. १५ सप्टेबंर २०२० रोजी सकाळी ११ : ३० वाजता आमरण उपोषण करतील. घनकचरा व्यवस्थापन कामातील भोगंळ कारभार कामगारांच्या लक्षात आल्यावर त्यांनी रोजंदारी मजदुर सेना या संघटनेकडे सभासद होवून किमान वेतन व प्रचलीत अदयावत कामगार कायदया प्रमाणे न्याय दयावा अशी विनंती केली. त्या नुसार मागील तीन वर्षा पासून शासन परिपत्रका प्रमाणे न्याय मिळावा या साठी विविध प्रकारचे निवेदन देवून प्रसंगी अनेक प्रकारचे लोकशाही पध्दतीने आंदोलन केले. त्या-त्या वेळी मा. अप्परजिल्हाअधिकारी, निवासीउपजिल्हाधिकारी, व जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्या दालनात विविध बेैठकीचा सपाटा लावून ईतिवृत तयार करून त्या प्रमाणे जिल्हयातील सर्व मुख्याधिकारी,नगरपरिषद/नगरपंचायत यांना अंमलबजावणी  करण्यचे निर्देश दिले त्या पत्राला सर्व मुख्याधिकारी यांनी केराची टोपली दारववली. त्यावर असमाधानी असल्याचे आगळे म्हणाले. कोरोनाच्या महामारीत सफाई कामगार ऐका योध्या प्रमाणे प्रमानिक काम करत आहे     पंरतू त्यांना शासनाने निर्धारित केलेले किमान वेतनच मिळत नाही, बाकी सुख सोयी फार लाबंच्या गोष्टी आहेत. किमान वेतन ११५००/-रुपये + विशेष भत्ता ५४१५/-रुपये ऐकूण १६९१५/ रुपये दर महा देणे बंधनकारक आहे. देतात फक्त प्रती कामगार ७०००/- रुपये देतात. जिल्हयात ऎकूण २०००/ सफाई कामगार आहेत. किमान वेतन मिळावे या करीता आंदोलन   नगरपरिषद बीड,माजलगांव व परळी वैजनाथ येथील सफाई कामगारांनी केले. त्या-त्या वेळी सफाई कामगारानां किमान वेतना पेक्षा कमी दराने वेतन देवून परळी,माजलगांव येथील कामगारांना अयोग्य/ बे कायदेशीर कामावरुन कमी केले.तर बीड येथील सफाई कामगारांना मागील आक्टोबर,नोव्हेंबर २०१९ चे दोन महिन्याचे थकीत वेतन न देता अयोग्य/ बे कायदेशीर कामावरुन  कमी केले. अश्या प्रकारे जिल्हयातील सर्व नगरपरिषद/ नगरपंचायत आस्थापना सफाई कामगारांना वेठबिगार/ गुलामा प्रमाने वागणूक देत आहे. असा गंभिर गुन्हा करणारया दोषीनां ऐवढे सहज सोडून देणे अवैध असून या सर्व दोषी कंत्राटदार व मुख्याधिकारी यांना अशिक्षित, अज्ञानी कामगारांची फसवणूक आणी त्यांच्या हाक्काचे किमान वेतन सन मार्च २०१५ ते ऑगस्ट २०२० पर्यन्त न देता कमी वेतन देवून त्यांच्या वेतनाचा अपहार करणारयावर फौजदारी गुन्हे दारवल करावेत. अन्यथा सफाई कामगांर प्रतिनीधी मा.विभागीय आयुक्त कार्यालय,औरगांबाद समोर दिनांक १५ सप्टेबंर २०२० रोजी सकाळी ११ वाजता आमरण उपोषण रोजंदारी मजदुर सेना महासचिव भाई गौतम आगळे यांच्या नेत्रत्वाखाली सुरु करण्यात येईल. अशी माहिती संघटनेचे जिल्हा अध्यक्षा अनिता बचुटे यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर