मातंग समाजच्या तरुणाच्या खुनातील आरोपींना तात्काळ अटक करा.- सकल मातंग समाजाची मागणी


परळी (प्रतिनिधी) -: तालुक्यातील कौडगाव घोडा येथील मातंग समाजाच्या तरुणाच्या खून  प्रकरणातील मोकाट असलेल्या आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक करावी आणि गुन्हा नोंदवून घेण्यात दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी या मागणी साठी मातंग समाजाच्या वतीने परळी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालय वर मोर्चा काढण्यात आला व निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. यावेळी युवा आंदोलन संघटनेचे  अशोकजी पालके, मानवहीत लोकशाही पार्टीचे भागवत वाघमारे, सत्यशोधक प्रतिष्ठानचे निलेश सगट, जेष्ठ कार्यकर्ते धी. राष्ट्रपाल, सरपंच गायकवाड, जितेंद्र मस्के आणि मातंग समाजाचे तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला

परळी तालुक्यात आज परत नव्याने 14 कोरोना पॉझिटिव्ह