अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्या प्रकरणी टाळाटाळ होत असल्याने नंदकिशोर चिखले यांचे परळी न.प. समोर अमरण उपोषण


परळी वै. (प्रतिनिधी) -:चंद्रकांत लक्ष्मणराव चिखले यांनी परळी नगर परिषद येथे सफाई कर्मचारी म्हणून बारा वर्षे सेवा केल्या नंतर सेवा चालू असतानाच दिनांक - १/९/२०१५ रोजी पाणीपुरवठा मोटार पंपाचे काम करत असताना त्यांचा मृत्यू झाला.
लाड कमिटीच्या शिफारशी नुसार सेवेतील मयत कर्मचाऱ्याच्या जागी कुटुंबातील व्यक्तीस सेवेत सामावून घेणे अपेक्षित असताना, वडिलांच्या जागी परळी वैजनाथ नगर परिषदेत नौकरी मिळण्यासाठी नंदकिशोर चिखले यांनी दिनांक ०२/११/२०१५ रोजी अर्ज केला परंतु उडवा उडवीच्या उत्तरा शिवाय पदरात काहीही पडले नाही. न.प.कडे विनंती अर्ज करून ५ वर्ष झाली तरी त्यावर कसल्याच प्रकारे विचार केला गेला नाही. हा माझ्या कुटुंबावर जाणीवपूर्वक केलेला अन्याय नाही का ? असा सवाल नंदकिशोर चिखले यांनी केला.
माझे वडील सेवेत असताना मयत झाल्यानंतर परळी वैजनाथ नगर परिषदेकडे येणे असलेली " सेवा उपदान रजा रोकिकरण, फरकाची रक्कम, पदोन्नतीतील फरकाची रक्कम " अद्यापही दिली गेली नाही. या बाबत वेळोवेळी नगर परिषदेतील संबंधित विभागाकडे चौकशी करत गेलो, परंतू प्रत्येक वेळी बजेट शिल्लक नसल्याचे कारण दाखवत उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचे काम सतत ५ वर्षांपासून नगर परिषदेकडू केल्या गेले.त्यामुळे मला उपोषणाला बसल्या शिवाय पर्यायच उरला नाही,परळी नगर परिषद कार्यालया समोर दिनांक १० सप्टेंबर २०२० रोजी कुटुंबासह अमरण उपोषणास बसणार असल्याचे नंदकिशोर चिखले यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केले.

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर