चक्रीवादळाच्या अवेळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे नुकसान झालेल्या उर्वरित आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना 71 कोटी 88 लक्ष रुपये मदत- पालकमंत्री धनंजय मुंडे
बीड,(प्रतिनिधी) दि.30:- जिल्ह्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे आलेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले होते यातील उर्वरित आपद्ग्रस्त बाधित शेतकऱ्यांना विशेष दराने 71 कोटी 88 लक्ष हजार रूपये मदत देण्यास मान्यता देण्यात आली आहे असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये "क्यार" व "महा" चक्रीवादळच्या नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अवेळी पावसामुळे राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यांमधील शेतीपिकांचे नुकसान झाल्याने या शेतीपिकांचे नुकसान झाल्याने बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाने ७३०९ कोटी ३६ लाख रूपये निधी यापूर्वी देखील वितरित केला आहे. दूसऱ्या टप्प्यात उर्वरित बाधित शेतकऱ्यांना निधी वाटपासाठी शासनाकडे अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली होती. औरंगाबाद विभागास 249 कोटी रुपये निधी मंजूर झाला असून त्यापैकी बीड जिल्ह्यास सर्वात जास्त 71 कोटी रुपये मिळाले आहेत. हा निधी शेत...