Posts

Showing posts from July, 2020

'वंचित'चा धसका कोरोना फक्त रविवारी ! उद्या पासून सर्व चालू ठेवा - अॅड. प्रकाश आंबेडकर

Image
अकोला (प्रतिनिधी) दि.31- वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेउन वंचित बहुजन आघाडी ची भूमिका नुकतीच जाहिर करत ३१ जुलै नंतर लॉकडाउन पाळणार नाही उलट लॉकडाउन तोडा.. जगु द्या अभियान सुरु करु.. या भुमिकेला अकोला जिल्ह्यातिल विविध व्यापारि व  विविध व्यावसायिक संघटनानी ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेचे स्वागत करुन समर्थन दिले होते. वंचित बहुजन आघाडीची कणखर भुमिका व वाढता प्रतिसाद याचा धसका घेत अकोला जिल्ह्यातील लॉकडाउन हे सोमवार ते शनिवार ऑड ईव्हन रद्द करुन प्रशासनाने वंचित बहुजन आघाडीची मागणी मान्य करुन सर्व समान्याना जगण्याचे बळ दिले. ज्यांच्या व्यवसायाला अद्याप परवानगी दिली नाही त्यांच्या साठी लढा पुढेही सुरुच राहिल.

स्वच्छता व डागडुजी चे कामाचे समाज कल्याण अधिकारी यांनी निधी लाटला - शेख युनूस बीड

Image
बीड (प्रतिनिधी) दि.31 -: बीड येथील समाज कल्याण आयुक्त बीड यांनी गेल्या दोन वर्षापासून समाज कल्याण च्या मार्फत केले जाणारे स्वच्छता लाईट रंगरंगोटी या कामांमध्ये कुछ चुराई केली असून यासाठी येणारा निधी खर्च केला नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे समाजकल्याण कार्यालयात स्वच्छ याची अतिशय बिकट अवस्था झालेली असून तुतारीच्या साधे पाईप सुद्धा बसवले नाही स्वच्छालय वापरण्यास पाण्याची व्यवस्था नाही सामाजिक न्याय भवन रंगरंगोटी सुद्धा केलेली नाही एवढे असतानाही शासन मार्फत येणारा निधी नेमका गेला कोठे असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका अध्यक्ष शेख युनूस यांनी उपस्थित केला आहे समाज कल्याण अधिकारी यांनी वरील नमूद केलेल्या आधीच्या पूर्वक विचार करून तात्काळ स्वच्छता व रंगरंगोटी व पाण्याची. उपलब्धता करण्याची मागणी यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात वंचित बहुजन आघाडी बीड तालुका अध्यक्ष शेख युनूस यांनी कळवले आहे.

परळी तालुक्यात आज परत नव्याने 14 कोरोना पॉझिटिव्ह

Image
परळी वै.(प्रतिनिधी) -: परळी  शहर व तालुक्यातील दि.30 जुलै रोजी 93 कोरोना संशयीताचे स्वॕबचे नमुणे घेण्यात आले होते.त्या 93 पैकी 14 कोरोना पाॕझिटिव्ह रुग्ण आढळुन आले आहेत.या वाढत्या कोरोना संसर्गामुळे कोरोनाची साखळी कधी थांबणार हा यक्ष प्रश्न परळीकरांना पडला आहे. आज राञी आरोग्य प्रशासनाने जाहिर केलेल्या अहवालात शहरात  13  तर ग्रामीण भागातील 1 असे एकुण 14 कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत.  परळी शहरातील 25 वर्षीय महिला परळी वैजनाथ, 3 वर्षीय महिला परळी वैजनाथ, 29 वर्षीय पुरुष परळी वैजनाथ,35 वर्षीय पुरुष अरुणोदय मार्केट, 34 वर्षीय पुरुष परळी वैजनाथ, 31 वर्षीय पुरुष परळी वैजनाथ, 69 वर्षीय पुरुष परळी वैजनाथ, 48 वर्षीय पुरुष बँक कॉलनी, 49 वर्षीय पुरुष विवेकानंदनगर, 41 वर्षीय महिला हमालवाडी,33 वर्षीय महिला पद्मावती गल्ली,आणि 68 वर्षीय महिला पद्मावती गल्ली,तर परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील 23 वर्षीय महिला कोरणा पॉझिटिव आढळून आली आहे

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती घराघरात आणि मनामनात साजरी करा - धनंजय मुंडे

Image
मुंबई (दि. ३१) - : २०२० हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, कोरोना मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत जयंती महोत्सव आयोजित न करता उद्या एक ऑगस्ट रोजी साजरी होणारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची शंभरावी जयंती घरच्या घरीच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून साजरी करावी असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. धनंजय मुंडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती जाग्या करत, २०२० हे वर्ष आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करत आहोत, यानिमित्ताने राज्य शासनाच्या वतीने विविध उपक्रमांचे व खास जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्याचे राज्य शासनाने ठरवले होते. परंतु जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटाने या सर्व संकल्पनाना बंधन घातलं आहे. हे बंधन शरीराला असू शकतं, पण मनाला नाही! अण्णाभाऊ साठे यांचे विचार त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून अजरामर झालेले आहेत. त्यामुळे यंदाची जन्मशताब्दी विशेष जयंती आपण घराघरात आणि मनामनात साजरी करूयात, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे. आपण सर्व जण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

पंतप्रधान पिक विमा योजनेला 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ -वसंत मुंडे

Image
परळी (प्रतिनिधी) -: देशामध्ये सर्व स्तरावर शेतकरी  आपल्या स्वतःच्या पिकाचा पिक विमा सेवा केंद्रावर जाऊन  भरत आहे. अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या अडचणी आल्यामुळे केंद्र सरकारकडे पीक विमा भरण्याची मुदत वाढ राज्य सरकारने मागितली होती या सर्व बाबीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मुदतवाढ 5 ऑगस्ट  पर्यंत पिक विमा भरण्यासाठी मिळाली याची माहिती काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी दिली आहे . तरीपण अनेक शेतकरी सातबारा ऑनलाइन न झाल्यामुळे व कोरणा लॉक डाऊन मुळे कागदपत्रे मिळत नसल्यामुळे सेवा केंद्रावर विमा भरताना अडचणी निर्माण झाल्यामुळे देशातील सर्वच राज्याने केंद्राकडे पिक विमा शेतकऱ्यांना भरण्यासाठी मुदतवाढ मागितली होती .त्यामुळे केंद्र सरकारने आज दिनांक 31 जुलै 2020 पंतप्रधान पिक विमा योजनेचे भारत देशाचे कृषी विभागाचे सहसचिव डॉ. आशिष कुमार भूतानि यांनी भारत सरकार कडून आदेश पारित केले आहेत.यामध्ये 5ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना दिलेली आहे. तरी शेतकरी बांधवांनी सेवा केंद्रावर जाऊन पिक विमा भरावा आसे आव्हान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व ...

स्वतःची व कुटुंबाची काळजी घेऊन साजरी करा बकरी ईद; धनंजय मुंडे यांनी दिल्या शुभेच्छा!

Image
परळी (दि. ३१) -: बीड जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता उद्याची बकरी ईद घरच्या घरी साजरी करावी या आवाहनासह जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मुस्लिम बांधवांना बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. यावर्षी कोरोना महामारीच्या वाढत्या प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वधर्मीय सण - उत्सवांना ब्रेक लागला आहे. सर्व धर्मियांनी या कठीण काळात आपले विविध सण - उत्सव साधेपणाने व घरच्या घरी साजरे करून आदर्श निर्माण केला आहे. बकरी ईद च्या  संदेशाचा प्रत्यय देऊन मुस्लिम बांधवानी हा आदर्श उत्सव घरीच साजरा करावा असे ना. मुंडे यांनी म्हटले आहे. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, दिवसेंदिवस वाढत जाणारे हे आकडे चिंताजनक आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्या सर्वत्र साजरी केली जाणारी बकरी ईद सुद्धा साधेपणाने साजरी करावी असे आवाहन ना. मुंडे यांनी केले आहे. कोणत्याही ठिकाणी गर्दी न करता कुर्बानी साठी स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे रीतसर परवानगी घेऊनच कुर्बानी द्यावी, तसेच शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांना...

शेख मोहम्मद फरहाल मोहम्मद जमील चे दहावीत ९९% टक्के घेऊन घव घवीत यश

Image
परळी वै.(प्रतिनिधी) -: इयत्ता  दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत शेख मोहम्मद फरहाल याने ९९% टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले असून याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.  परळी शहरातील मलीकपुरा  येथील मोहम्मद जमील यांचा मुलगा मोहम्मद फरहाल  यांनी दहावी बोर्ड परीक्षेत ९९% टक्के घेऊन घव घवीत यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षक परिवार, नातेवाईक, मित्रपरिवार व परळी शहरातील नागरीकानी कौतुक करून अभीनंदन व्यक्त केले.

अनिल मुंडे यांची अ. भा. भ्रष्टाचार निर्मूलन समिती परळी ता. अध्यक्षपदी निवड

Image
परळी वै.(प्रतिनिधी) :- येथील अनिल  ज्ञानोबा  मुंडे  यांची  नुकतीच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष  समितीच्या परळी  तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.      या  बाबत राष्ट्रीय  अध्यक्ष प्रदीप पाटील  खंडापूरकर यांनी  अनिल  मुंडे यांना  नियुक्ती पञ दिले आहे. टोकवाडी येथील अनिल मुंडे हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.      समाजातील सर्व  सामान्यांचे या  संघटनेच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यासाठी आपण काम करणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. त्यांच्या या  निवडीबद्दल सर्वञ त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

अकोल्यातील हॉटेल - रेस्टॉरंट मालकांचे लॉकडाउनविरोधात ॲड प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा !

Image
अकोला दि. ३१ - शासनाने ३१ जुलै नंतर लॉक डाऊन वाढविला तर वंचीत बहुजन आघाडी त्याला विरोध करेल, असे ऍड प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केल्यानंतर अनेक संघटना पुढे येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यवसायांना याचा फटका बसलेला आहे. हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायाला तर याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायीक आर्थिक संकटात आले असून यामध्ये काम करणाऱ्या मजुरांवर तर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे मालकांना मोठ्याप्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे.  या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकतीच लॉकडाउन तोडो अभियानाची घोषणा केली. त्या अनुषंगाने काल रात्री अकोला जिल्ह्यातील हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांनी ॲड बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला आहे . तसेच संपूर्ण व्यावसायिक या लॉकडाउन तोडो अभियानात सहभागी होऊन वंचित बहुजन आघाडीच्या भुमीकेसोबत राहण्याची ग्वाही दिली. यावेळी पक्षाचे सर्व पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते. अशी माहिती राज्याचे प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.

सौरभ बालाजी फड यांचे दहावीच्या परीक्षेत 94.20 %गुण घेऊन नेत्रदीपक यश

Image
परळी (प्रतिनिधी) -: संपूर्ण जगभर कोरोणाने धुमाकूळ घातल्या नंतर खूप उशिराने दहावीचे निकाल लागले आहेत त्यामध्ये महाराष्ट्र राज्य दहावी बोर्डाचे निकाल मध्ये, परळी तालुक्यातील अनेक गुणवंत विद्यार्थी त्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थी परिवारातील पाल्यांनी यश संपादन केले आहे  त्यामध्ये अभिनव विद्यालय परळी या शाळेतील विद्यार्थी सौरभ बालाजी फड  यांनी दहावीच्या परीक्षेत 94.20% गुण घेऊन  नेत्रदीपक यश संपादन केले आहे, त्यांच्या अभ्यासाची सुनियोजित वेळा पञक तयार करून त्यांनी हे यश संपादन केले आहेत शाळेतील मुख्याध्यापक, गुरुजन वर्गाने सांगून दिलेल्या अभ्यासाच्या योग्य पद्धतीने केल्या मुळे या विद्यार्थ्यांना उत्तुंग झेप घेतली आहे, घरातील अभ्यासासाठी असलेले आई वडीलांचे अभ्यास योग्य पोषक वातावरण देखील महत्त्व असतं असं सौरभ फड यांनी बोलताना सांगितले, कठोर परिश्रम दहा/दहा तास अभ्यास केल्या नंतर आशा यश संपादन केले जाऊ शकते, त्यांच्या पुढील शैक्षणिक कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत व त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन वर्षा होत आहे.

वंचित आघाडीत मराठा समाजाच्या जेष्ठ नेत्याचा प्रवेश

Image
बीड ,दि. ३० -:  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गेवराई तालुक्यातील गढी सर्कलचे मराठा समाजाचे नेते बाबुराव सखाराम आबुज यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहिर प्रवेश केला.        गेवराई या ठिकाणी झालेल्या एका कार्यक्रमात मराठा समाजाचे जेष्ठ नेते बाबुराव आबुज यांनी वंचित मध्ये प्रवेश केला. यावेळी वंचितचे राज्याचे महासचिव भिमराव दळे, जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर, बाळासाहेब मस्के,  वैभव स्वामी व वंचित बहुजन आघाडीचे नेते सय्यद सुभान उपस्थित होते.

शेतकर्‍यांना पीक कर्जापासून वंचित ठेवणार्‍या बँक व्यवस्थापकाविरूद्ध कारवाई करा - वंचित

Image
जालना,दि. ३० -: येथील तालुक्यातील शेतकर्‍यांना पीक कर्ज देण्यास बँक व्यवस्थापक जाणूनबुजून टाळाटाळ करीत आहे. शेतकर्‍यांना पीक कर्जापासून वंचित ठेवण्याचे काम करीत असल्याने वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज बँकेसमोर निदर्शने करून व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. जालना तालुक्यातील काही शेतकर्‍यांना अद्यापही स्टेट बँक ऑफ इंडिया,अलाहाबाद बँक, सिंडिकेट बँक, सेन्ट्रल बँक , स्टेट बँक ऑफ इंडिया व इंडियन बँक या जालना भागातील बँकांनी अद्यापही पीक कर्जाचे वाटप केलेले नाही. या बँकाकडून जाणीवपूर्वक त्रुटी काढून शेतकर्‍यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना खरीपसह रब्बी पिकांना वेळेवर खते व औषधी देण्यात यावी. तसेच बँक ऑफ इंडियाच्या जुना मोंढा बँक प्रशासनाने सिबेल चेक करुन महिंद्रा होम फायनान्सचे कारण दाखवून तुम्हांला पीक कर्ज देता येत नाही असे सांगून कर्ज देण्यास नकार दिला आहे. या उलट शासन व जिल्हाधिकारी यांनी सरसकट आदेश दिले आहे,  शेतकर्‍यांना कर्ज वाटप करण्याचे, असे असतानाही बँक व्यवस्थापक  व अधिकारी शेतकर्‍यांची पिळवणूक करीत आहे. यामुळे माळशेंद्रा, वंजारउम...

जिल्ह्यात लाॅकडाऊनचा कालावधीत वाढ, मनाई जमावबंदी आदेश 31 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत लागू - जिल्हाधिकारी राहुल रेखावार जिल्ह्यात काही नवीन बाबींना अटी व शर्तीसह 5 आॅगस्ट पासून परवानगी

Image
बीड, दि. ३० :- राज्यात दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत लाॅकडाऊनचा कालावधी वाढवलेला आहे. त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहितेच्या कलम 144 (1)(3)अन्वये मनाई , जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असून हे आदेश दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत लागू राहतील असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. तसेच राज्य शासनाचे आदेशानुसार खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.सदर आदेशानुसार  काही बाबींना  पुढील अटी व शर्तीसह दिनांक 05 आॅगस्ट 2020 रोजी पासून जिल्ह्यामध्ये परवानगी देण्यात आली आहे  1. मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सस यांना चित्रपटगृह व्यतिरिक्त सकाळी 09.00 वा. ते सायंकाळी 7.00 वा पर्यंत कोवीड -19 विषयक सर्व नियमांचे पालन करणेचे अटीवर दिनांक 5 ऑगस्ट 2020 रोजी पासून चालू ठेवण्यास परवानगी असेल, तसेच मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्स मधील फूड कोर्ट/ रेस्टॉरंटस यांना फक्त घरपोच सेवा होम डिलेव्हरी साठी परवानगी असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांनी असे नगरपालिका, नगरपंचायती यांनी दिलेल्या दिशा निर्देशाचे पाल...

शेतकऱ्यांच्या पिककर्जासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले 'हे' आवाहन!

Image
बीड (दि. ३०) - : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या पीककर्जाच्या संबंधित एक महत्वपुर्ण निर्णय घेतला असून, पीक कर्जापासून एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये यासाठी संबंधितांना आदेश दिले आहेत. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार खरीप हंगाम २०२० - २१ मध्ये पीक कर्जासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना विविध कारणांमुळे कर्ज मिळत नाही , त्यांना तलाठ्यांमार्फत आपली माहिती सादर करण्याचे आवाहन केले आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपली माहिती आधार कार्ड, पॅन कार्ड, गावचे नाव, मोबाईल क्रमांक, शेतकऱ्याचा एकूण लाभक्षेत्र यासह सविस्तर माहिती विहित नमुन्यामध्ये सादर करण्याबाबत आवाहन केले आहे. ना. मुंडे यांनी जिल्हाधिकारी यांना निर्देशित केल्याप्रमाणे सदर आदेशान्वये, संबंधीत शेतकऱ्यांचे अर्ज घेऊन ते तलाठी - मंडळ अधिकारी यांचेमार्फत मार्गी लावून त्यांना पीक कर्ज मिळवून देण्यासाठी कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच गावातील सेवा सहकारी संस्था किंवा जिल्हा बँकेच्या यादीत एखाद्या शेतकऱ्याला पीक कर्जासाठी अपात्र ठरवले असल्यास त्याचे...

परळी तालुक्यात कोरोनाचा धमाका!तालुक्यात आज नव्याने 17 रुग्णाची भर

Image
परळी वै.प्रतिनीधी -: परळी  शहर व तालुक्यातील दि.29 जुलै रोजी 57 कोरोना संशयीताचे स्वॕबचे नमुणे घेण्यात आले होते.त्या 57 पैकी 17 कोरोना पाॕझिटिव्ह रुग्ण आढळुन आल्याने तालुक्यात आज कोरोनाचा धमाकाच झाला आहे.या वाढत्या कोरोना संसर्गामुळे  पुन्हा एकदा शहर व तालुका लाॕकडाउन करण्याची गरज निर्माण झाली आहे. आज राञी आरोग्य प्रशासनाने जाहिर केलेल्या अहवालात शहरात  15  तर ग्रामीण भागातील 2 असे एकुण 17 कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत. शहरातील 39 वर्षीय पुरुष बँक कॉलनी, 35 वर्षीय पुरुष  विद्यानगर, 20 वर्षीय पुरुष टीपीएस कॉलनी, 33 वर्षीय पुरुष परळी,27 पुरुष वर्षीय टी एस कॉलनी,45 वर्षीय महिला आयोध्यानगर, 43 वर्षीय पुरुषपरळी वैजनाथ,24 वर्षीय महिला परळी वैजनाथ, 65 वर्षीय पुरुष माणिक नगर,21वर्षीय पुरुष परळी वैजनाथ, 38 वर्षीय पुरुष परळी वैजनाथ,35 वर्षीय पुरुष परळी वैजनाथ, 40 वर्षीय पुरुष परळी वैजनाथ,35 वर्षीय महिला तहसील कार्यालय, 21 वर्षीय पुरुष हमालवाडी तर तालुक्यातील जलालपुर येथील 54 वर्षीय महिला व धर्मापुरी येथील 45 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह रुग

थर्मल मधील निवृत्त कर्मचारी अंबादासराव देशमुख यांचे निधन

Image
परळी वै.(प्रतिनिधी) -: येथील थर्मल पॉवर स्टेशन मधील निवृत्त कर्मचारी अंबादासराव एकनाथराव देशमुख यांचे काल बुधवार दि.२९ रोजी रात्री १०.३० वा सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यू समयी ते ७५ वर्षांचे होते.शक्तीकुंज वसाहतीतील श्रीराम मंदिर उभारणीत त्यांचे योगदान होते. सुधाकर,रत्नाकर, प्रभाकर देशमुख यांचे ते वडील होत. शहरातील शिवाजी नगर येथील रहिवासी असलेले थर्मल पॉवर स्टेशन मधील निवृत्त कर्मचारी तथा प्रतिष्ठीत नागरिक अंबादासराव एकनाथराव देशमुख यांचे बुधवारी रात्री निधन झाले.अतिशय मनमिळाऊ ,संयमी धार्मिक स्वभावामुळे ते सर्वदूर परिचित होते.त्याच्या पश्चात पत्नी, ३ मुले सुने नांतवडे असा परिवार आहे.शहरातील मोक्षधाम स्मशानभूमीत अंबाबदासराव देशमुख यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनाने देशमुख कुटुंबावर कोसळलेल्या दु:खात दक्ष न्युज परिवार सहभागी आहे.

मिलिंद शाळेचा निकाल ९१.६६ %

Image
परळी वै .(प्रतिनिधी) -: दि.२९ जुलै २०२० रोजी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२० चा निकाल घोषित करण्यात आला. प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी प्रज्ञा एज्युकेशन सोसायटी संचलित मिलिंद माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेचा निकाल ९१.६६ % लागला असून यामध्ये विशेष प्राविण्यासह १७ विद्यार्थींनी उत्तीर्ण झाले. तसेच प्रथम श्रेणीतून २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  शाळेतून एकूण ९६ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होते, त्यांपैकी एकूण ८८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. शाळेतून सर्व प्रथम कु. यशश्री सिद्धेश्वर रनखांबे ९३.६० गुण घेवून प्रथम आली आहे. द्वितीय कु. वैष्णवी परशुराम गित्ते ९१.२० तर शाळेतून तृतीय येण्याचा मान कु. विशाखा विश्वास रोडे या विद्यार्थीनीस मिळाला. विशेष प्राविण्यासह ९६ पैकी १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  सय्यद उमर अहेमद ताज मोहम्मद ८६.८०, श्रेयस संजय शेप ८६.२०, अंजली सुभाष कसबे ८५.६०, रोहीनी नवनाथ तांदळे ८५.२०, आकांक्षा युवराज जगतकर ८३ , प्रेरणा संजय जोगदंड ८२.२० , प्रियंका महादेव घोडके ८१.४० या विद्यार्...

ससाने,वीर,गवळी,धसे,वासनिक, शरणागत यांचे दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश

Image
बीड (प्रतिनिधी) -: संपूर्ण  जगभर कोरोणाने धुमाकूळ घातल्या नंतर खूप उशिराने दहावीचे निकाल लागले आहेत त्यामध्ये महाराष्ट्र राज्य दहावी बोर्डाचे निकाल मध्ये, बीड जिल्ह्यातील अनेक गुणवंत विद्यार्थी त्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे त्यांची नावे पुढील प्रमाणे परिवारातील पाल्यांनी यश संपादन केले आहे  त्यामध्ये  कु.कृतिका किरण ससाने 91% संस्कार विद्यालय बीड, चि.सुशांत सुभाष 90.40%, चंपावती विद्यालय बीड, चि.आपूर्व मोहन गवळी 90% चंपावती इंग्लिश स्कूल बीड, कु. कांचना अनंत धसे 85% चंपावती इंग्लिश स्कूल बीड, कु.मृणाली प्रशांत वासनिक 79.21%, तुलसी इंग्लिश स्कूल बीड प्रशांत विश्वनाथ शरणागत 41% यांनी दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे, त्यांच्या अभ्यासाची सुनियोजित वेळा पञक तयार करून त्यांनी हे यश संपादन केले आहेत शाळेतील मुख्याध्यापक, गुरुजन वर्गाने सांगून दिलेल्या अभ्यासाच्या योग्य पद्धतीने केल्या मुळे या विद्यार्थ्यांना उत्तुंग झेप घेतली आहे, घरातील अभ्यासासाठी असलेले आई वडीलांचे अभ्यास योग्य पोषक वातावरण देखील महत्त्व असतं असं या विद्यार्थ्यांनी बोलताना सांग...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

Image
बीड (प्रतीनिधी) -: जागतिक  कीर्तीचे मराठी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त  सामाजिक उपक्रमाने साजरी करून महापुरुषांना एका आगळ्यावेगळ्या  उपक्रमाने जयंती साजरी करण्याचे आयोजन बीड येथे करण्याचे ठरवले  आहे जागतिक महामारी कोरोणाच्या पार्श्वभूमीवर  अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अवाढव्य खर्च व्यतिरिक्त सामाजिक सलोखा सामाजिक उपक्रमाने अबाधित ठेवण्यासाठी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या  जन्मशताब्दीनिमित्त  शासकीय रुग्णालय बीड येथे दिनांक 1 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 9 ते 3पर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरीही चळवळीतील युवा मित्र सहकारी आंबेडकरी तरुण बहुजन समाजातील युवकांनी रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान करून महामानवाचे विचार तेवत ठेवण्याचे काम करावे .लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा विचारांचा उलगडा करण्यासाठी मराठी साहित्यातील,कादंबरी,पोवाडा  लोकनाट्य,प्रवासवर्णन असे अनेक साहित्य त्यांनी मोठ्या ताकतीने पहिले आहे.महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महारा...

तुलसी इंग्लिश स्कूल चा 100% निकाल

Image
बीड (प्रतिनिधी) -: देवगिरी प्रतिष्ठान संचलित,तुलसी इंग्लिश स्कूल, संत ज्ञानेश्वर नगर, बीड  इयत्ता १० वी चा १०० %  निकाल लागला असून  शाळेतील सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतील एकूण विद्यार्थ्यांपैकी 75 टक्के विद्यार्थी ८० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. 92.20 % गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान कुमारी सायली अशोक उगले या विद्यार्थिनीने मिळविला तर द्वितीय सागर कैलास वाघमारे 88.80 %,तृतीय कुमारी हर्षदा हरिहर बुगदे 88.40 %या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे मान मिळविला. राजवीर संजय वाघमारे, ईश्वर परमेश्वर धायगुडे, अजय परमात्मा धायगुडे, कुमारी मृणाल प्रशांत वासनिक, सय्यद नुमान जावेद, विवेक बंडू अडसूळ, कुमारी अस्मिता रावसाहेब कांबळे, आशिष जयवंतराव बिडकर या विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण गुण मिळवून यश संपादन केले        शहरातील नामांकित शाळांपैकी तुलसी  इंग्लिश स्कूल बीड ही शाळा असून 100 % निकालाची परंपरा शाळेने याहीवर्षी कायम राखली आहे    देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.प्रा. प्रदिप रोडे व तुलसी...

शासनाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी केली जात नाही याला जबाबदार कोण -भाई गौतम आगळे

Image
परळी(प्रतिनीधी) -: जिल्हायातील सर्व नगरपरिषद / नगरपंचायत आस्थापनेत कार्यरत कंत्राटी / रोजंदारी सफाई कामगारांना किमान वेतन व अस्थितवातील अदयावत प्रचलीत कामगार कायदे असतांना सुध्दा त्याचा लाभ सफाई कामगारांना मिळत नाही, याला जबाबदार कोन असा सतंप्त सवाल कामगार नेते भाई गौतम आगळे यांनी मा.ना.मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री तथा बीडजिल्हा पालक मंत्री यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.           या बाबत सविस्तर वृत असे की जिल्हयातील सर्व मुख्याथिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत व जिल्हा प्रशासकीय अधिकारी यांच्या संगनमताने हा गोरखधंदा चालतो की काय अशी चर्चा कामगार करतांना दिसुन येत आहे. जिल्हयात मागील अनेक वर्षा पासून शासनाच्चा परिपत्रकायी, उद्योग, उर्जा व कामगार विभागाने काढलेत्या पत्राची तसेच मा. ज़िल्हाअधिकारी, अप्परजिल्हाअधिकारी, व निवासी उपजिल्हाअधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठीकीच्या ईत्तिवृत्त या सर्वानां केराची टोपली दाखवुन किमान वेतन कायदा व अदयावत प्रचलीत कामगार कायदे पायदळी तुडविले जात आहेत. जिल्हयातील सर्व मुख्याधिकारी कंत्राटदारास पुढे करु...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर : राज्याचा निकाल ९५.३० टक्के, पुन्हा मुलींचीच बाजी!

Image
मुंबई / पुणे -: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल एकूण ९५.३० टक्के लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे. याही वेळी मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे.  विद्यार्थीनी - ९६.९१ टक्के विद्यार्थी - ९३.९० टक्के  यंदाही राज्यात मुली अव्वल सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९२.७३ टक्के मागील वर्षापेक्षा १८ टक्क्यांनी निकाल वाढला कोकणाने मारली बाजी पुन्हा एक नंबर विभाग  पुणे  ९७.३४ औरंगाबाद  ९२.०० नागपूर ९३.८४ नाशिक ९३.७३ मुंबई   ९६.७२ कोल्हापूर ९७.६४ लातूर ९३.९ अमरावती ९५.१४ कोकण ९८.७७ नागपूर ९३.८४  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत...

बीड जिल्हा रुग्णालयातील कोरोना पॉझिटिव्ह आरोपी फरार

Image
बीड (प्रतिनिधी) -: येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेला कोरोना पॉझिटिव्ह आरोपी रुग्णालयातून फरार झाल्याचा प्रकार बुधवारी सकाळी (दि.29) समोर आला आहे. या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी माहिती दिली. एका आरोपीचा कोरोना अहवाल 22 जुलै रोजी पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.मंगळवारी सायंकाळपर्यंत तो आरोपी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होता.त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने आणि कोरोनाची लक्षणे सौम्य झाल्याने त्याला आयटीआयमधील कोव्हीड सेंटरमध्ये रेफर करण्यात येणार होते.मात्र याच वेळी त्याने संधीचा फायदा घेत रुग्णालयातून पळ काढला.बुधवारी सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.   सहा दिवस घेतले उपचार  दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आरोपीने जिल्हा रुग्णालयात सहा दिवस उपचार घेतले.त्याला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत असल्याने आयटीआय कोव्हीड सेंटरमध्ये रेफर करण्यात येत होते.मात्र याच वेळी त्याने सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकत पळ काढला.   तीन वार्ड एक स्टाफ नर्स हायरिस्क कोरोना पॉझिटिव्ह आरोपीला धूम ठोकण्याची  संधी ...

गूड न्यूज, तुमचं वीज बिल कमी होणार !

Image
मुंबई – राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ग्राहकांच्या वाढीव वीज बिलात 20 ते 30% सूट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे 93% वीज ग्राहकांना वीज बिल सूट दिल्यानंतर फायदा होणार आहे. वीज बिल सूट देण्यासाठी जानेवारी ते मार्चमधील वीज युनिटचा विचार केला जाणार असून वीज बिल सूट देण्याबाबत राज्य सरकार MERC ला प्रस्ताव देणार आहे. दरम्यान MERC ने प्रस्ताव मंजूर केल्यानंतर पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव येणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर राज्यातील एकूण 73 लाख घरगुती वीज ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. वाढीव वीज बिलांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बैठक घेतली. या बैठकीला ऊर्जामंत्री नितीन राऊत, अनिल परब उपस्थित होते. या बैठकीत वीज बिलात सूट देण्याबाबत MERC ला प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील वीज ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

कोरोनावर मात केलेल्यांनी आपला प्लाझमा देऊन कोरोनाग्रस्तांचा जीव वाचवण्यासाठी मदत करावी - डॉ.अभिजित सायंबर

Image
आष्टी (प्रतिनिधी) -: सध्या  जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे.जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावर लस तयार करत आहेत परंतु लस तयार होईपर्यंत नागरिकांनी विनाकारण आपल्या घराबाहेर न पडता शासनाला सहकार्य करून आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी.ज्या रुग्णांनी कोरोना आजारवर मात केली आहे अशांनी आपला प्लाझमा देऊन कोरोनाग्रस्त रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी मदत करण्याचे आवाहन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल,केईएम हाॕस्पीटलमध्ये एम.डी, झालेले फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ.अभिजित सायंबर यांनी केले. डॉ.अभिजित सायंबर यांनी आयोजीत पञकारा परिषदेत हे मत व्यक्त केले. डाॕ.अभिजित सायंबर हे एमबीबीएस ,एम.डी. (फुफ्फुसरोग तज्ञ आहेत. त्यांनी आजपर्यंत धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, केईएम मध्ये काम केलेले आहे. तज्ज्ञ डॉ.अभिजित सायंबर सध्या डाॕक्टरांना मार्गदर्शन करीत आहेत.कोरोनाचे रुग्ण हे आष्टी शहरातच नाही तर ग्रामीण भागात सुध्दा आढळूनं येत आहेत. दिवसेंदिवस कोरोना ग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही संख्या रोखण्यासाठी शासन विविध प्रकारच्या उपाय योजना राबवित आहे.सर्वसामान्य नागरिकांनीही सोशल डिस्टनसिंग,उत्तम प्र...

कामगार कल्याण केंद्रातर्फे शंभर कामगारांना मास्कचे वाटप सामाजिक अंतर ठेवा, घरी रहा, सुरक्षित रहा: जी. एस. सौंदळे

Image
परळी (प्रतिनिधी) -: कोरोना संसर्गाची लागण कामगारांना होऊ नये व कामगार सुरक्षित राहावे, यासाठी कामगार कल्याण केंद्राच्या वतीने येथील राज्य परिवहन मंडळातील कर्तव्यावर असणाऱ्या शंभर कामगारांना मास्कचे वाटप करण्यात आले.   यावेळी आगार प्रमुख रणजित राजपूत, समुपदेशक जी. एस. सौंदळे, वाहतूक निरिक्षक  अनिल बिडवे, केंद्र संचालक आरेफ शेख यांच्या हस्ते कामगारांना मास्कचे  वाटप करण्यात आले.   राज्य परिवहन मंडळातील तंत्रज्ञ, लिपिक व इतर कर्मचाऱ्यांना या मास्कचे वितरण करण्यात आले.  कामगारांना वाटप करण्यात आलेले मास्क कामगार कल्याण केंद्राच्या महिला कर्मचारी उमा ताटे व मसरत खान यांनी स्वतः तयार केले आहे.  यासह अंबाजोगाई, बीड, कळंब, उस्मानाबाद, लातूर, उदगीर, निलंगा येथील कामगार केंद्रातील महिला कर्मचाऱ्यांनी तयार केलेले मास्क ही विविध आस्थापनेतील  कामगारांना वाटप करण्यात आले. मास्क तयार करणाऱ्या  महिला कर्मचाऱ्यांची कामगार कल्याण अधिकारी भालचंद्र जगदाळे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.  प्रत्येक नागरिकांनी सामाजिक अंतर ठेवावे व  घरी राह...

संपादक व पत्रकार सेवा संघाच्या संपर्कपदी भगीरथ बद्दर यांची निवड

Image
परळी (प्रतिनिधी) - संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र ह्या सामाजिक व राजकीय संपर्क प्रमुखपदी परळी पोलखोलचे संपादक भगीरथ बद्दर यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्य अध्यक्ष किसन भाऊ असे यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना दिले आहे. परळी येथील ज्येष्ठ पत्रकार तथा परळी पोलखोलचे संपादक भगीरथ बद्दर यांची संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र संपर्कप्रमुख (सामाजिक व राजकीय) पदी निवड झाली आहे पत्रकारिता सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रातील बदर यांचे योगदान लक्षात घेऊन संस्थेच्या संघटनात्मक कार्यासाठी सदरची निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल राज्य कार्यवाह मनोज साकी, सचिव अरविंद गाडेकर यांनी अभिनंदन केले आहे.

ऑटो रिक्षा चालकांना प्रतिमहिना 7,500 देण्यात यावा - संतोष निकाळजे बीड जिल्हा असंघटित कामगार काँग्रेसची कमिटीची मागणी.

Image
बीड (प्रतिनिधी) दि.28 - लाॅकडाऊन मुळे संपूर्ण मानवजातीचे जनजीवन विस्कळीत झाले आहे, या कालावधी मध्ये अनेक उद्योगधंदे तसेच हातावर पोट असणाऱ्या ऑटो रिक्षा चालक मालक यांना उपासमारीची वेळ आली आहे, त्यांना शासनाने 7,500 रुपये प्रति महिना मानधन देऊन अर्थसहाय्य करावे अशी व इतर मागण्यांचे निवेदन बीड जिल्हा असंघटित कामगार काँग्रेसचे अध्यक्ष संतोष निकाळजे यांनी जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन देण्यात आले आहे. कोरोणा च्या जागतिक महामारी मुळे सर्वजन भरडले गेले आहेत त्यामध्ये ऑटो रिक्षाचालक-मालक यांच्या वर खूप वाईट दिवस आले आहेत, रोजीरोटी व रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. बीड जिल्ह्यातील असंघटित कामगार काँग्रेस कमिटीच्या वतीने कामगारांच्या न्याय हक्कासाठी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा चालकांना आरटीओ द्वारा आकारण्यात येणारे शुल्क नूतनीकरण, प्रवासी वाहतूक, वाहन नोंदणी शुल्क, या शुल्का मध्ये एक वर्ष माफ करण्यात यावे, ऑटोरिक्षा खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते पुढील सहा महिन्यापर्यंत वसूल करण्यात येऊ नये, व त्यावरील व्याज माफ करण्य...

परळीत शहरातून होणारी अवैध राख वाहतुक बंद करा, सोमनाथ फड यांचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन 5 आँगस्ट पर्यंत राखेची वाहतूकीवर निर्बंध घातले नाहीततर आत्मदहन-सोमनाथ फड

Image
परळी वै.(प्रतिनिधी) :- शहरातील होणारी अवैध राखेची वाहतुक बंद करा, अशी मागणी उपजिल्हाधिकारी यांच्या कडे सोमनाथ फड यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.  सोमनाथ फड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परळी परिसारातुन राजरोज दिवस रात्र आवैध राख वाहतुक होत असुन यामुळे परळी-कन्हेरवाडी-अंबाजोगाई रोड वरील सर्व गांवे व अजुबाजोच्या खेडोपाडी नागरीकांना व वयवृध्द यांना दमा व लहान मुला-मुलींचा कुपोषणाचा व इतर सर्व आजराची मोठ्या प्रमाणपणात वाढ होत आहे. तरी में साहेबांनी या आवैध राख वाहतुकीवर निबंध लवकरात लवकर लावण्यात यावे जेणे करून परळी व परीसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची संपुर्ण जबाबदारी आपणावर राहील. अन्यथा आपण याच्याकडे दुर्लक्ष केले तर नाविलाजस्तव दि.५ ऑगस्ट २०२० रोजी आत्मदहन करीत आहे. याची संपुर्ण जाबदारी आपणावर व शासनावर राहील असा इशारा कन्हेरवाडीचे सोमनाथ अच्युत फड यांनी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. या निवेदनाच्या प्रती ना.धनंजय मुंडे , साहेब बीड जिल्हा पालक मंत्री व सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधि...

ह.भ.प. वासुदेव महाराज मुंडे शास्त्री यांची भगवान बाबा महाशक्ती आघाडीच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी निवड

Image
परळी (प्रतिनिधी) -:   ह.भ.प.सहयोगी प्राध्यापक वासुदेव महाराज शास्त्री मुंडे गोपीनाथ गडकर (एम.ए.संस्कृत, नेट,सेट)  यांची भगवान बाबा महाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य समस्त संयोजक कमिटी यांच्या वतीने बीड जिल्हा वारकरी सांप्रदाय संघटना आघाडी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.तरी या संघटनेमध्ये अनेक सांप्रदायिक, धार्मिक, व्यशनमुक्ती,रक्तदान,वधुवर सुचक मेळावे, अनाथाश्रम कार्य, गोरक्षण आदी अनेक कार्य या संघटने मार्फत केले व घेतले जातात म्हणून या संघटनेने आमच्या जीवनातील शैक्षणिक व आध्यात्मिक कार्य पाहून आम्हाला वारकरी संघटना आघाडी बीड जिल्हा अध्यक्ष पदी निवड केली गेली आहे.   तरी संपूर्ण  क्षेत्रातून आध्यात्मिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकार आदी मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत मी आभारी संपूर्ण मान्यवरांचा व श्री संत भगवान बाबा महाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य पदाधिकारी समस्त विश्वस्त मंडळीचा या निवडी बद्दल महाराजांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

उद्या दहावीचा निकाल

Image
पुणे – दरवर्षी दहावीचा निकाल हा साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र, यंदा करोना संकटामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उद्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निकाल जाहीर झाल्यावर शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in, mahresult.nic.in वर उपलब्ध होणार आहे. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात १७ लाख ६५ हजार ८९८विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये ९ लाख ७५ हजार ८९४ विद्यार्थी, तर ७ लाख ८९ हजार ८९८ विद्यार्थिनी आहेत. दहावीची परीक्षा ही ३ मार्च २०२० ते २३ मार्च २०२० दरम्यान घेण्यात आली. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने दहावीचा शेवटचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. ज्याचे गुण आता इतर विषयांमध्ये मिळणाऱ्या गुणांच्या सरासरीनुसार दिले जाण्याची शक्यता आहे. कुठे पाहाल निकाल ? mahresults.nic.in maharashtraeducation.com results.mkcl.org mahahsscboard.maharashtra.gov.in कसा पाहाल निकाल? – दहावीचा निकाल पाहण्यासाठी वरती दिलेल्या संके...

गुन्हे दाखल होण्याची भीती दाखवू नका, माझी जेलमध्ये जाऊन राहायची तयारी - ऍड. प्रकाश आंबेडकर

Image
अकोला, दि. २७ - राज्यात यापुढे लॉकडाऊन मध्ये वाढ करू नका, नागरिक कोरोना ऐवजी बेरोजगारी व उपासमारीने मरतील. असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊन मुदतवाढीला जोरदार विरोध केला आहे. अकोला येथील सर्किट हाऊस मध्ये  झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  सरकारने ३१ जुलैनंतर पुन्हा लॉकडाऊन वाढवल्यास रस्त्यावर येऊन विरोध करु, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. यावेळी त्यांनी गुन्हे दाखल होण्याची भीती दाखवू नका, माझी जेलमध्ये जाऊन राहण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. ते अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. आमचा पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आता आम्हाला फक्त लॉकडाऊन मोडावा लागेल. दानदात्यांची क्षमता संपलेली आहे. त्यामुळे आता तरी शासनाने लोकांना मदत करावी. ३१ जुलैनंतर राज्यात लॉकडाऊन वाढवू नये. अन्यथा रस्त्यावर उतरुन विरोध करु. सरकार गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवत आहे. मात्र ती भीती आम्हाला दाखवायची नाही. माझी जेलमध्ये जाऊन राहण्याची तयारी असल्याचेही ते म्हणाले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख ...

मुस्लिमांच्या धार्मिक संस्कृती मध्ये हस्तक्षेप करणारा प्रतिकात्मक कुर्बानी चा आदेश शासनाने त्वरित बदलावे- गुलशन ए खिजरा परळी

Image
परळी (प्रतिनिधि) :- मुस्लिम समाजाचा महत्त्वाचे सण असणारे इद-उल-अजहा बकरी ईद निमित्त शासनाने काढलेल्या मार्गदर्शक सुचाना मध्य त्वरित बदल करण्यात यावे अश्या मागणी मा मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना परळी चे तहसीलदार मार्फत गुलशन ए खिजरा चे अध्यक्ष शेख अख्तर हमीद व सहकार्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. सविस्तर वृत्त असे की कोविड-19 च्या महामारी च्या संकटकाळात आपल्या सरकारने संपूर्ण राज्यात सणासुदीत व धार्मिक विधींसाठी नियमावली बनवली आहे त्याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या काही दिवसात मुस्लिम समाजाचा अत्यंत महत्त्वाच्या सणानिमित्त (ईदुल अजहा /बकरी ईद ) महाराष्ट्र शासनाच्या गृहविभाग कडून परिपत्रक प्रसिद्ध केले आहे .या परिपत्रकानुसार ईद च्या निमित्त कोणती दक्षता घ्यायची याची प्रसिद्धी दिली आहे. परंतु याच परिपत्रक च्या  क्रमांक 3 नियमात म्हटले आहे की " शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी करणे" .           या मुद्द्यावरच आम्हाला प्रश्न पडला आहे प्रतीकात्मक #कुर्बानी म्हणजे नक्की काय सरकारने याचा खुलासा करावा. "प्रतीकात्मक कुर्बानी "करण्यास सांगणे म्हणजे सरकार चे हेतू...

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे वाढदिवसानिमित्त आयोजित सेवासप्ताहातील विविध स्पर्धांचा निकाल जाहीर; लवकरच पारितोषिक वितरण -बाजीराव भैय्या धर्माधिकारी परळीतील पहिल्या वहिल्या मेगाआॅनलाईन स्पर्धांना संबंध महाराष्ट्रातून उत्स्फुर्त सहभाग

Image
परळी वै.(प्रतिनिधी) -: राज्याचे  उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार  व सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या  विविध आॅनलाईन स्पर्धांचा निकाल  घोषित करण्यात आला आहे. या स्पर्धांना स्पर्धकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यामुळे परिक्षकांसाठी निकाल अव्हानात्मक ठरला.लवकरच विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली आहे.       सेवा सप्ताह काळात विविध अभिनव आॅनलाईन स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. प्रथमच आयोजित ऑनलाईन स्पर्धांना भरभरून प्रतिसाद मिळाला.यामध्ये परळी पंचक्रोशीतील विविध ठिकाणांचे फोटो फेसबूक माध्यमातून प्रकाशित करण्यात आले. एक्सप्लोरिंग परळी स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.अतिशय रोचक व रोमहर्षक ही स्पर्धा ठरली. त्याचप्रमाणे आजा नच ले डान्स स्पर्धा, बजाते रहो वादन स्पर्धा,मेरी आवाज सुनो गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आल्या.या स्पर...

आव्हाड कुटुंबियांचे धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन

Image
पुणे (दि. २७) - : पुण्यातील ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. भास्करराव आव्हाड यांच्या कुटुंबाची राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन सांत्वन केले, यावेळी ऍड. आव्हाड यांच्या स्मृतींना उजाळा देत ना. मुंडे यांनी ऍड. भास्करराव आव्हाड यांना श्रद्धांजली अर्पण केली.  महाराष्ट्र - गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष तथा पुण्यातील ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. भास्करराव आव्हाड यांचे नुकतेच पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले होते.  पुणे आणि महाराष्ट्रातील विधी क्षेत्रात अनेक वकील घडवलेले ऍड. आव्हाड यांचे एनटी - ड आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत मोठे योगदान होते. त्यांच्या जाण्याने सामाजिक व विधी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.  धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी भेट देऊन आव्हाड कुटुंबियांचे सांत्वन करत ऍड. भास्करराव आव्हाड यांना श्रद्धांजली अर्पण केली, यावेळी ऍड. अविनाश आव्हाड, कमलकाकू आव्हाड, आशिष पाटील यांसह आव्हाड कुटुंबीय उपस्थित होते.

बीड येथे सामाजिक न्याय दिन साजरा

Image
बीड (प्रतिनिधी) दि.27 सामाजिक न्याय दिना निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड या ठिकाणी प्रशांत वासनिक यांनी स्वखर्चातून हॅन्ड फ्री सनीटायझर स्टॅन्डची भेट दिली त्याप्रसंगी जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी दाते बसपाचे नेते प्रशांत वासनिक भागवत वैद्या, माजी कॅप्टन राजाभाऊ आठवले, प्रा.अशोक गायकवाड, नितीन मुजमुले, रजनीकांत वाघमारे, चेतन वाघमारे व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे शेतक-यांचा विमा भरण्याचा प्रश्न सुटला ! खामगांव, मालेवाडी आले प्रधानमंत्री विमा पोर्टलवर ; शेतक-यांनी विमा भरण्यास केली सुरवात

Image
परळी (प्रतिनिधी) दि. २७ -: पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले असून तालुक्यातील मालेवाडी, खामगांव ही गांवे आता प्रधानमंत्री विमा पोर्टलमध्ये समाविष्ट झाली आहेत. गावातील शेतक-यांनी या पोर्टलवर  विमा भरायलाही सुरूवात केली आहे. दरम्यान, पंकजाताई मुंडे यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल  दोन्ही गावच्या शेतक-यांनी त्यांचे आभार मानले आहेत.   मालेवाडी व खामगांव ही गांवे तेथील ग्रामस्थांच्या मागणीवरून पंकजाताई मुंडे यांनी मंत्री असताना  परळी तालुक्यात समाविष्ट करून घेतली होती. तालुक्याचे ठिकाण बदलल्याने या गावांना केंद्राच्या गॅझेटमध्ये येण्यासाठी विलंब लागला.  प्रधानमंत्री पीक योजनेतंर्गत विमा भरण्यासाठी या गावातील शेतक-यांना मात्र यामुळे मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत होते. शेतक-यांनी ही अडचण पंकजाताई मुंडे यांच्या कानावर घातली असता त्यांनी गेल्या आठवडयात जिल्हाधिकारी रेखावार यांना दूरध्वनी करून पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय पातळीवर लगोलग हालचाली केल्या आणि काल या दोन्ही गावाचा समावेश प्रधानमंत्री विम...

लोकनेत्या मा.पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शहरातही अनेक कार्यक्रम राबविण्यात आले

Image
परळी (प्रतिनिधी) -: मागच्या पाच वर्षात महाराष्ट्रात भाजपचे सरकार होते त्यावेळी महिला व बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी नवजात मुलींचा दर वाढवा यासाठी अनेक योजना राबविल्या होत्या.आजही केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार वेगवेगळ्या योजना राबवित आहे.      मा.पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी उपजिल्हा रुग्णालयात 26 जुलै रोजी 24 तासात जन्म घेणाऱ्या मुलींना पायातील चांदीचे वाळे,हातातील चांदीचे कडे व जन्मदात्या आईस साडी चोळी तसेच जन्मदात्या पित्यास वृक्ष भेट देण्यात येत असून प्राथमिक स्वरूपात सौ.भाग्यश्री कृष्णा परिहार यांनी गोंडस मुलीला जन्म दिला या मुलीस पायातील चांदीचे वाळे,चांदीचे हातातील कडे व जन्मदात्या आईस साडी चोळी तसेच जन्मदात्या पित्यास मुलीच्या नावाने वृक्ष भेट देण्यात आले.     परळी शहरात योगेश पांडकर यांनी आगळा वेगळा कार्यक्रम घेतला आहे.या कार्यक्रमाची सर्व स्तरातून कौतुक होत आहे.   या कार्यक्रमावेळी भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश सदस्य ऍड.अरुण पाठक, सौ.सुचिताताई सचिन पोखरकर,सौ.आश्विनी योगेश पांडकर,भाजयुमोचे विजय दहिवाळ, नितिन मुंडे,ग...

ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्प

Image
अकोला,दि.२७ प्रतिनिधी - येथील महानगरपालिकेतील वंचित बहुजन आघाडीच्या गट नेत्या ॲड धनश्री देव व निलेश देव यांच्यावतीने आज रुग्णवाहिकेचे लोकार्पण वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.  आजच्या कोरोना काळात लोकांना आरोग्यविषयक अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, अशा वेळी सर्वात मोठी समस्या रुग्णवाहिकेची निर्माण झालेली आहे याची जाणीव ठेवून निलेश देव मित्र मंडळाच्यावतीने आज रुग्ण वाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रदेश प्रवक्ता डॉ धैर्यवर्धन पुंडकर, मनपा गटनेत्या ॲड धनश्री देव, प्रदेश प्रवक्ता राजेन्द्र पातोडे, प्रदेश महिला महासचिव अरुंधती शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे उपस्थित होते.

अतिवृष्टी व पीक विम्याचे पैसे बँकेत जमा असतानाही वाटप का नाही ? - वसंत मुंडे

Image
परळी(प्रतिनिधी)-: महाराष्ट्रात 2019 ला अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांना पंचनामे करून अनुदान मंजूर करण्यात आले. 2019 चा पिक विमा मंजूर आहे ,तरीही  बँकाकडून शेतकऱ्यांना का वाटप करीत नाहीत  असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे रोजगार मंत्रालय भारत सरकार यांनी केला आहे.  महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असून 2019 चा पिक विमा अतिवृष्टी रक्कम तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा करून संबंधित ज्या त्या बँकेकडे पैसे वर्ग केले आहेत .तरीही शेतकऱ्यांना कठीण प्रसंगी मदत होईल अशी आशा आहे परंतु बँक स्तरावर वाटप अनुदान केले जात नाही याची कसून चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केली आहे .कोराना रोगा मुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कारण गेली चार महिने झाले सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून शेतीमाल योग्य  भावा न मिळाल्यामुळे अडचणीत शेतकर्याच्या भर पडली आहे.पेरणीला शासन स्तरावर तात्काळ कर्ज वितरण करण्यासंदर्भात आदेश आले, परंतु बँकेकडून जाणून-बुजून शेतकऱ्याला त्रास कसा होईल अशी रचना करण्यात आली. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात ...

शेतकऱ्यांनी ३१ जुलै पूर्वीच विमा भरावा-सोपान मुंडे

Image
परळी (प्रतिनिधी) - : प्रधानमंत्री  पिक विमा योजना बीड जिल्ह्यासाठी विशेष प्रयत्नाने मंजूर झाली असून आपले सरकार सेवा केंद्र तसेच विविध बँकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरवून घ्यावा असे आवाहन नागदरा येथील युवा शेतकरी सोपान मुंडे यांनी केले आहे.    शेतकर्यांसाठी खरीप हंगामात  पिक विमा भरण्याची अंतिम मुदत दिनांक 31 जुलै 2020 असून यामध्ये कुठलीही मुदतवाढ  मिळणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता असे दिसून येते की शेतकरी अगदी शेवटची तारीख येईपर्यंत विमा उतरवत असतात. शेवटी शेवटी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास विमा उतरवणे शक्य होत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर आपल्या पिकाचा विमा उतरून घ्यावा असे आवाहन नागदरा येथील युवा शेतकरी सोपान मुंडे यांनी केले आहे

उद्धव ठाकरे तुम्ही खुदा बनू नका, लॉकडाऊन वाढवू नका- प्रकाश आंबेडकर.

Image
पुणे,दि.२६ - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपण कोरोनामुळे होणारा मृत्यू दर आटोक्यात आणू, असे म्हटले आहे. त्यावर उद्धवजी तुम्ही खुदा बनू नका,अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे,भारतीयांची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यामुळे त्यांना जास्त काही होणार नाही,ते कोरोनाने नाही तर रोजगार बुडाल्याने मरतील. त्यामुळे तुम्ही लॉकडाऊन वाढवू नका,अस ही मागणी ही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.                     भारतात 40 टक्के नागरिक कोरोनाने बाधित होतील असे अमेरिकेच्या हाफकीन संस्थेने सांगितले होते. पण एकाच आठवड्यात ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, भारतात कोरोना पसरणार नाही. भारतातील नागरिकांची प्रतिकारशक्ती चांगली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे म्हणणे खरे ठरले असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले  बुद्धाने एक सत्य वचन सांगितले आहे की, माणूस जन्माला आला तर त्याला मृत्यू हा निश्चित आहे, त्यामुळे शासनाला विनंती आहे की, देशाच...

सरूबाई शिवाप्पा नावंदे यांचे निधन अशोक नावंदे यांना मातृशोक

Image
परळी (प्रतिनिधी) -: श्रीमती  सरूबाई शिवाप्पा नावंदे रा.परचुंडी ता.परळी वैजनाथ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 100 वर्षाच्या होत्या. आदर्श शिक्षक अशोक नावंदे यांच्या त्या मातोश्री होत. परचुंडी येथील जेष्ठ नागरिक श्रीमती सरूबाई नावंदे यांचे शनिवार दि.25 जुलै रोजी निधन झाले. रविवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या पार्थिवावर परचुंडी ता.परळी वैजनाथ येथे अंत्यविधी होणार आहेत. त्या 100 वर्षाच्या होत्या. विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. संस्कारशिल कुटूंबाचा त्या आधारवड होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आदर्श शिक्षक अशोक नावंदे यांच्या त्या मातोश्री होत्या. औरंगाबाद येथील प्रसिद्ध प्रेस छायाचित्रकार भीमाशंकर नावंदे यांच्या त्या काकु होत.

पंकजाताईंच्या वाढदिवसा निमित्त 1042 कुटुंबाना आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे करणार वाटप भाजपा युवानेते नरसिंग सिरसाट यांचा उपक्रम

Image
परळी (प्रतिनिधी) -: माजी  मंत्री भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांचा दि.26 जुलै रोजी वाढदिवस असुन यानिमीत्त भाजपा युवानेते नरसिंग सिरसाट यांच्या वतिने रोगप्रताकारक शक्ती वाढवणार्या व भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शिफारस केलेल्या आर्सेनिक अल्बम -30 या होमिओपॅथी  गोळ्यांचे वाटप करण्यात येणार असुन परळी शहरातील 1042 कुटुंबांना या गोळ्या वाटप करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा युवानेते नरसिंग सिरसाट यांनी दिली.       माजी मंत्री तथा भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कार्यकर्त्यांच्या वतिने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत परळी व परिसरात मागील काही दिवसात कोरोना विषाणुचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे दररोज बाधीत रुग्ण आढळत असुन या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असले तरी प्रशासनाच्या उपाययोजना सर्वसामान्य जनतपर्यंत पोंहचत नाहीत.कोरोना विषाणुची लागण होवु नये यासाठी आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती प्रभावी असावी लागते ही प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून प्...

अमृत अटल पाणी योजना,व ड्रेनेज योजना केवळ गबाड़ लाटण्यासाठी - डॉ नितिन सोनवणे. बीड न.प.ची बोगस गिरी

Image
बीड (प्रतिनिधी) दि.25 -: बीड शहरातील अजची परिस्थिती असी आहे की जनतेला चालण्यासाठी रस्ते चांगले नाहीत जे होते ते ड्रेनेज निर्मिती करण्या साठी खोडून काढले आहेत चालताना चिखल, खड़े, पानी यातून मार्ग शोधत चालावे लागते. वयोवृद्ध व मुले घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत केवळ ड्रेनेज च्या नावांवर निष्क्रिय काम करून करोडो रुपए लाटले असेच म्हणावे लागेल, तलाव पूर्ण भरलेले असताना केवळ लाइट बिल थकित असल्या कारनाणे नळाला 15-15 दिवस पाणी सोडले जात नाही हे असे आहे,  अमृत अटल योजना राबविली खरी पण पाणी त्याच्यात येईल का ?  हा प्रश्ण पडला आहे पाण्याच्या नावांवर हवा वाट्याला येईल असेच दिसत आहे. कोरोना साठी उपाय योजना राबविण्यात यायला हव्यात नगरपालिका दवाखने मध्ये योग्य सुविधा उपलब्ध करून रुग्णांसाठी बरेच करण्या सारखे आहे, ठीक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे, त्यासाठी उपाय योजना नाहीत अश्या परिस्थिति मध्ये सुसज्य गार्डन करोडो रुपए खर्च करायचे हे काही जनतेला पटनार नाही. भर लॉकडाऊन मध्ये  रस्त्यावरील खांब्यांवर लाईट नव्हते अत्ता ही बर्‍याच ठिकाणी नाहीत आणि तिकडे सूशोभिकरन साठी किती त...

सामाजिक न्याय दिनानिमित्तमास्क,सॅनीटायझर व हॅन्डस फ्री स्टॅन्डचे वाटप - प्रशांत वासनिक

Image
बीड (प्रतिनिधी) दि.25 -: सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून बीड शहरातील महत्वाच्या शासकीय कार्यालयामध्ये बीएसपी चे नेते प्रशांत वासनिक यांच्या वतीने, शासकीय कार्यालया मध्ये हॅन्डस फ्री स्टॅन्ड, मास्क, भेट देण्यात येत आहे, जनतेची खूप मोठ्या प्रमाणात वर्दळ असते अशा ठिकाणी लावले जाणार आहे, सध्या बीड जिल्ह्यासह शहरात कोरोणाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत याचा सार्वजनिक संसर्गाचा धोका लक्षात घेता आपली सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी स्व-खर्चातून या महत्त्वपूर्ण वरदळीच्या शासकीय कार्यालयां च्या प्रवेश द्वारा जवळ सर्वसामान्य जनतेसाठी  सुरक्षित  ठेवण्याच्या उद्देशाने हॅडस फ्री सॅनीटायगर स्टँड व सनीटायझर बॉटल्स व एक संपुर्ण सेठ दिला जाणार आहे , या स्टॅन्डचे वैशिष्ट्य असे आहे की हात न लावता फक्त पायाच्या दबावाने सॅनीटायझर हे वापर कर्त्याच्या व्यक्ती च्या हातामध्ये येतं त्यामुळे कुठलाही संसर्ग पसरत नाही, अशा शासकीय कार्यालयात येणाऱ्या सर्व नागरिकांच्या उपयोगाची हॅडस फ्री सॅनीटाझर स्टँड हे भेट केले जाणार आहे. 26 जुलै सामाजिक न्याय दिना निमित्त संपूर्ण देशभर साजरा केला जातो त्यानि...

म.रा. कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी राहुल पोटभरे तर परळी तालुका अध्यक्षपदी दिलीप भालेराव यांची निवड.

Image
परळी प्रतिनिधी :- म. रा. कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या पदाधिकार्‍यांच्या फेरनिवडी संदर्भात अंबाजोगाई येथील राधानगरी याठिकाणी कास्ट्राईब संघटनेचे विभागीय (लातूर) अध्यक्ष बालासाहेब सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. ह्या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी श्री.गौतम जोगदंड सर  हे होते.          गेल्या अनेक दिवसांपासून संघटनात्मक कामांचा आलेला अनुभव व प्रशासन,अधिकारी यांच्याकडून काम करून घेण्याची आलेली हातोटी पाहून  महाराष्ट्र राज्य कर्मचारी कल्याण महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी राहुल पोटभरे तर दिलीप भालेराव  यांची परळी तालुका अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.  याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कर्मचारी कल्याण महासंघ परळी तालुक्यातील कार्यकारणीची ही फेरनिवड करण्यात आली.बीड जिल्हा व परळी तालुक्यातील शिक्षकांचे प्रश्न माहित असल्याने नवनियुक्त कार्यकारणी हे प्रश्न नक्की मार्गी लावेल असा विश्वास बालासाहेब सोनवणे सर यांनी व्यक्त केला. इतर संघटनांतील पदाधिकाऱ्यांना एका छत्राखाली आणून कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची बीड...

प्रभारी गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी यांना केज येथे पाठवा - संजय गवळी परळी गटशिक्षण अधिकाऱ्याचा अनागोंदी कारभार

Image
परळी (प्रतिनिधी) दि.24 -: परळी गट शिक्षणाधिकारी (प्रभारी) गणेश गिरी यांना त्यांचा मूळ पदावर केज या ठिकाणी शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती  केज येथे बदली झाली होती, पण राजकीय वरदहस्त प्राप्त असल्यामुळे ते परळी इन्चार्ज म्हणून पदभार सांभाळून काम करत आहेत, व राजकीय वरदहस्ता मुळे मनमानी कारभार करत आहेत, त्यांना मूळ ठिकाणी पाठवणे बाबत संजय गवळी यांचे बीड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना निवेदन दिले आहे. सध्या बीड जिल्ह्यात अनेक विभागात प्रभारी पदाधिकारी यांचा बोलबाला आहे, त्यातच परळी गटशिक्षण अधिकारी गणेश गिरी (प्रभारी) हे मूळ केज पंचायत समिती येथे कार्यरत आहेत, त्यांना परळी गटशिक्षण अधिकारी तो ही प्रभारी म्हणून नियुक्त केला आहे, त्यांना त्यांच्या मूळ पदावर पाठवून परळी शहराला कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी देण्यात यावा या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष संजय गवळी यांनी एका निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्याकडे मागणी केली आहे, सन 2018 मध्ये पंचायत समिती केज येथेल पदावर पंचायत समिती अंबाजोगाई येथून बदली झाली होती परंतु गेली...

निवडणुका घेण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आदेश काढावा, सर्व अधिकार निवडणूक आयोगालाच - प्रकाश आंबेडकर

Image
पुणे, दि. २४ - : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमता येतो, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला असून या निर्णयाचे पुनरावलोकन करावे, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाला केली आहे.       राज्यात अनेक  ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपत आला असून काहींचा कार्यकाल संपलेला आहे. अशा ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केली असून त्याबाबतचा अध्यादेश राज्यपालांनी काढला आहे. मुळात असा अध्यादेश शासनाच्या सांगण्यावरून राज्यपालांना काढता येत नाही. शिवाय असा अध्यादेश राज्यपालांना काढता येतो का हा ही एक मोठा प्रश्न आहे, त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तशी शिफारस करावी लागते, तरच असा अध्यादेश काढता येतो. शिवाय प्रशासक म्हणून गैर अधिकारी ठेवता येत नाही. कारण त्याने त्या पदाची शपथ घेतलेली नसते. त्यामुळे त्याची नेमणूक घटनाबाह्य असते किंवा अशा व्यक्तीची नेमणूक केल्यावर त्याला शपथ देता येत नाही तशी तरतूद ही घटनेत नसल्याचे वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. लोकसभा, विधानसभा किं...