Posts

Showing posts from August, 2020

प्रभू वैद्यनाथ देवस्थान विकास कृती समिती सहसचिवपदी चेतना गौरशेटे यांची नियुक्ती

Image
परळी (प्रतिनिधी) -: प्रभू वैद्यनाथ देवस्थान विकास कृती समिती सहसचिवपदी चेतना गौरशेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र नुकतेच प्रभू वैद्यनाथ देवस्थान विकास कृती समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी प्रदान केले आहे. यावेळी अॅड. जीवनराव देशमुख, संतोष शिंदे, गिरीश भोसले, महादेव शिंदे, लक्ष्मण वाकडे, दत्तात्रय काळे आदी उपस्थित होते. सहसचिवपदी चेतना गौरशेटे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

मा.ना.धनंजय मुंडे यांनी इराणी वस्ती येथे दिलेल्या शब्दाची केली पूर्तताप्रभाग क्र.९ मधील राहिलेल्या कामांची लवकरच सुरुवात - किशोर पारधे (नगरसेवक तथा स्वच्छता सभापती)

Image
परळी (प्रतिनिधी) -: महाराष्ट्राचे समाजकल्याण मंत्री मा.ना.धनंजयजी मुंडे यांनी इराणी वस्ती मधील मस्जिद समोर इराणी समाजाला दिलेल्या शब्दाची पूर्तता करत मा.वाल्मिक अण्णा कराड न.प.गटनेते यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्याच्या टाकी व लाईटचे हायमास्ट बसवून आज वचनपूर्ती केली तसेच लवकरच राहिलेले इतर कामे सुद्धा लवकरच पूर्ण करण्यात येतील.           आज दि.२९/०८/२०२० रोजी मा.वाल्मिक अण्णा कराड न.प.गटनेते यांच्या मार्गदर्शनाखाली इराणी वस्ती मध्ये बसवण्यात आलेल्या लाईटच्या हायमास्ट चे लोकार्पण करून पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे उदघाट्न व नवीन शिवाजी नगर येथून इराणी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. या सर्व कामाचे उदघाट्न व लोकार्पण कारतांना या भागातील नगरसेवक तथा स्वच्छता सभापती किशोर पारधे, ह.भ.प. भरत महाराज गुट्टे, अक्रम अली (इराणी सरदार) सतीश अण्णा जगताप (शिवसेना नेते), युवा नेते दिनेश गजमल, तालेबसेठ बेग, जहीर बेग, अमोलजी सूर्यवंशी, शुभमजी नागरगोजे, विकास रुपनर, रामभाऊ ढेंगळे, खमर अली, बालाजी आव्हाड, आबासाहेब कांबळे...

पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालय परळीतून स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला ना.धनंजय मुंडे यांनी दिला पूर्ण विराम !कार्यालय तर राहिलेच आणि कार्यक्षेत्र वाढवून दिले ; परळीचे जलवैभव वाढवले - बाजीराव भैय्या धर्माधिकारी सर्वस्तरातून निर्णयाचे स्वागत

Image
परळी वै.(प्रतिनिधी) -: परळीतील  बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता कार्यालय लातुर येथे स्थलांतरीत करण्याच्या जोरदार हालचाली सुरू होत्या. याबाबतचे ना.धनंजय मुंडे हे कार्यालय स्थलांतरित होऊ नये यासाठी सुरुवातीपासून प्रयत्नशील होते. पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालय परळीतून स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला ना.धनंजय मुंडे यांनी  पूर्ण विराम मिळवून दिला आहे. हे कार्यालय आता परळीत तर असणार आहेच तसेच या कार्यालयांतर्गत तीन जिल्ह्यांचा कारभार चालणार आहे.कार्यक्षेत्र वाढवून परळीचे जलवैभव वाढवले  असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.        राज्य शासन जलसंपदा विभागाने नुकत्याच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार परळी पाटबंधारे विभागाचे वैभव वाढणार असून परळी पाटबंधारे मंडळ कार्यालयास, माजलगाव कालवा विभाग क्रं ७ गंगाखेडसह एकूण ४ उपविभाग परळीस जोडून एकूण ४ विभाग आणि अतिरिक्त २९ उपविभागांचे कामकाज आता परळीतून चालणार आहे. यासाठी परळीचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सातत्याने प्रयत...

पंढरपूरला हजारोच्या संख्येने जाणार - जोगदंड,सरवदे

Image
बीड(प्रतिनिधी) अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पांडुरंगाच्या दर्शनासाठी मंदिथर प्रवेश आंदोलन करण्यात येत आहे कोरोनाच्या संक्रमणामुळे गेल्या चार ते पाच महिना पासून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यासाठी 31 ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेना हजारो वारकऱ्यांसोबत मंदिर प्रवेशासाठी आंदोलन करणार आहेत या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे करणार आहेत. बीड जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत मंदिर भक्तासाठी खुलं करावं या आंदोलनासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे या नियोजनासाठी वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्याठिकाणी हजारोच्या संख्येने वारकरी यांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी पंढरपूर या ठिकाणी जाणार असल्याचे जिल्हाउपाध्यक्ष संतोष जोगदंड व जिल्हा कार्यकारणी सदस्य अजय सरवदे कळविले.

बीड जिल्ह्यातून हजारो वारकरी विठुरायाच्या दर्शनाला जाणार - सचिन मेघडंबर

Image
बीड( प्रतिनिधी) दि.29 वंचित  बहुजन आघाडीची बैठक संपन्न बीड येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न 31 आगस्ट रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या विठ्ठल रुक्माई मंदिर खुले करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी मंदिर खुले करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, विश्व वारकरी सेना या संघटनेला वंचित बहुजन आघाडी यांनी पाठिंबा दिला आहे, यासंदर्भात आज बीड येथे बैठक आयोजन केलं होतं सचिन मेघडंबर जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी बीड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी सूत्रसंचालन डॉ.गणेश खेमाडे  यांनी तर प्रस्तावना अजय सरवदे यांनी केली यावेळी बीड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई, माजलगाव बीड जिल्ह्यातून 25 हजार वारकरी व कार्यकर्ते पंढरपूरला विठ्ठल रुक्माई च्या दर्शनाला जाणार, या बैठकीला सर्व जिल्हाधिकारी कार्यकर्ते हजर होते. ज्येष्ठ नेते बबन वडमारे यांनी मार्गदर्शन केले या बैठकीस जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष संतोष जोगदंड ,भारत तांगडे ,धम्मानंद साळवे ,वैष्णव दगडू  गायकवाड ,पोद्दार अंकुश,  जाधव बीड तालुका अध्यक्ष शेख युनूस शहरा...

तुकाराम गोदाम यांचे दुःखद निधन

Image
परळी (प्रतिनिधी) दि.28 सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम गोदाम यांचा आज दुपारी घर  हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने  निधन झाले. ते  80 वर्षांचे होते. त्यांनी सामाजिक व शैक्षणिक कार्यात नेहमीच सहभागी होते, चाळीस वर्ष शिक्षक म्हणून काम केले. गोदाम गुरुजी यांनी नौकरीसाठी परळी तालूकातील परिसरात नौकरी केली व येथेच सेवानिवृत्त झाले,ह.मु. सोमेश्वर नगर परळी येथे रहिवासी असून आज 28/08/2020 शुक्रवार रोजी सायंकाळी शांतीवन समशान भूमी मध्ये त्यांच्या पार्थिव शरीरावर अंतिम संस्कार करण्यात आला. यावेळी आप्तस्वकीय कुटुंबातील मंडळी उपस्थित होते.

पांडुरंगाच्या दर्शनासाठी मराठवाड्यातून हजारो वारकरी जाणार!अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मंदिर प्रवेश आंदोलन- अशोक हिंगे

Image
बीड (प्रतिनिधी) दि.28 वारकरी संप्रदायाने लॉकडाऊन विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे  करोना संक्रमणामुळे गेल्या चार पाच महिन्यापासून  बंद असलेले विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुली करण्यासाठी 31 अॉगस्ट रोजी विश्व वारकरी सेनेनं एक लाख वारकऱ्यांसोबत मंदिर प्रवेशासाठी आंदोलन करणार आहेत या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे करणार आहेत. मराठवाड्यातून हजारोच्या संख्येने वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत, मंदिर भक्तांसाठी फुल्ल करावं या आंदोलनात आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांनी केले आहे. करोना संसर्गामुळे गेल्या चार पाच महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे याचा फटका सर्वांना बसला आहे राज्यात मिशन बिगिन अंतर्गत अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले असेल तरी धार्मिक स्थळांना आणि सण- उत्सवांना तितकासा दिलासा मिळाला नाही यंदा आषाढीवारी प्रतिकात्मकरित्या साजरी करण्यात आली आषाढी याञेदिवशी पंढरपुरात वारकऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली  हो...

सिद्धेश्वर इंगोले यांच काव्यस्पर्धेत यश..

Image
परळी वै.(प्रतिनीधी) -: येथील कवी चित्रकार सिद्धेश्वर इंगोले यांनी सोलापूर येथील घे भरारी साहित्य समूहाच्या वतीने घेण्यात आलेल्या भरारी प्रिमीयम लीग २०  या  महा काव्यस्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला.सोलापूर येथील घे भरारी साहित्य समूहाच्या वतीने भरारी प्रिमीयम लीग २०  (बी.पी.एल)महा काव्यस्पर्धेचे आयोजन  कवी तेजस गायकवाड, पुरूषोत्तम चंद्रात्रे,पवन तिकिटे यांनी केले होते.या स्पर्धेत दोनशे हून अधिक कवींना सहभाग घेतला होता.अंतिम फेरीसाठी  गुणानुक्रमे पन्नास स्पर्धक पात्र ठरविण्यात आले होते.    अंतिम फेरीत 'माहेर' या विषयांवरील रचनांचे डॉ.पल्लवी बनसोडे परुळेकर,शरद कवठेकर, तृप्ती काळे या  तीन  नामांकित परीक्षकांकडून परीक्षण करण्यात आले.मे - जून - जुलै  या कालावधीत या स्पर्धेतील काव्यफेरी घेण्यात आलेल्या होत्या.या स्पर्धेत सिद्धेश्वर इंगोले यांनी तृतीय क्रमांक मिळविला याबद्दल कवी बालाजी कांबळे, साहित्यिक रानबा गायकवाड,सिनेनाट्य दिग्दर्शक प्रा.सिद्धार्थ तायडे, विकास वाघमारे,मुक्तविहारी,लक्ष्मण लाड,गणगोपलवाड,कवी राजकुमार यल्लावाड यांनी ...

संत विचारांचे पाईक सोपान कुकडे यांना श्रद्धांजली

Image
सिरसाळा (प्रतिनिधी) -: धारूर  तालुक्यातील कान्नपुर येथील रहिवाशी व माजलगाव कालवा वसाहत सिरसाळा येथे वाहन चालक म्हणून जलसंपदा खात्यातील अधिकाऱ्यांच्या परिचयात व संपर्कात असलेले कै सोपान धोंडिबा कुकडे उर्फ काका यांचे छोट्याशा अपघाताने अकाली दुःखद निधन झाले. कुकडे यांच्यावर संत विचारांचा प्रभाव होता. त्यामुळे शांत संयमी वा समंजस व्यक्ती म्हणून परिचित होते. त्यांच्या अकाली जाण्याने संत विचारांचा पाईक गमावला असल्याची भावना श्रद्धांजलीत व्यक्त केली यावेळी अभियंता श्री पी. एम. जाधव साहेब, एस बी फुलारी, एम एम मुंडे, राजकुमार सिनारे आणि श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयाचे व जलसंपदा विभागाचे कर्मचारी  उपस्थित होते..

नेतृत्व घडवणारे वस्ताद...

Image
महाराष्ट्रातही जागतिकीकरणानंतर वृत्तपत्राबरोबरच विविध प्रकारची प्रसारमाध्यमे विकसित झाली.वृतपत्र व्यवसायात भांडवलदार, मोठे उद्योग समूह आल्याने,शहर जिल्हा, तालुका पातळीवर वृत्तपत्रांची संख्या वाढल्याने या क्षेत्रात काम करणार्‍या माध्यमकर्मींचा एक मोठा घटकच तयार झाला. लोकशाहीचा चौथा खांब म्हणून, समाजातील सर्व घटकांचे प्रश्‍न राजकीय व्यवस्थेसमोर मांडणार्‍या आणि सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी झगडणार्‍या माध्यम क्षेत्रालाही विविध प्रश्‍नांना सामोरे जावे लागते.लघु वृत्तपत्र चालकांसह, माध्यम कर्मींना तर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, पत्रकारांना मिळणारा तुटपुंजा पगार, नाममात्र मानधन यामुळे, बाहेरून असलेले या क्षेत्राचे आकर्षक प्रत्यक्षात काम करताना किती आर्थीक पातळीवर विदारक आहे याची जाणीव होते, त्यामुळे या माध्यम क्षेत्राचे प्रश्‍न सोडवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ असले पाहिजे,काम करणाऱ्यांना  न्याय,सन्मान मिळाला पाहिजे या उद्देशाने दैनिक जनप्रवास आणि सांजमहानगरी वृत्तसमुहाचे संपादक संजय भोकरे हे  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई संघटनेच्या स्थापने पासुन कार्यर...

परळी वैजनाथ औष्णिक वीज प्रकल्प ग्रस्तांच्या जागेची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे ऊर्जामंत्री यांनी दिले निर्देश

Image
मुंबई, दि. २५-: दाऊतपुर येथील 4 उमेदवारांनी परळी वैजनाथ औष्णिक वीज प्रकल्प यामुळे प्रकल्पग्रस्त कोट्यातून महानिर्मिती कंपनीत नौकरी मिळविण्यासाठी सादर केलेले दावे तपासून घेण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले. परळी वैजनाथ औष्णिक वीज केंद्रामुळे प्रकल्पग्रस्त उमेदवारांना महानिर्मिती कंपनीत नोकरी देण्याच्या संदर्भात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत आज फोर्ट येथील वीज कंपनीच्या कार्यालयात बैठक पार पडली. या 4 उमेदवारांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र सादर केले असून सकृतदर्शनी प्रकल्पासाठी त्यांच्या जमिनी संपादित न केल्याने दर्शविलेल्या ठिकाणी जाऊन वस्तुनिष्ठ भूसंपादनाचा अहवाल सादर करण्याचे आदेश डॉ. राऊत यांनी संबंधितांना दिले असून त्यानंतर सदर दावे निकाली काढण्यात येणार आहे. दाऊतपूर येथील 22 प्रकल्पग्रस्तांच्या प्रकरणातील 4 दावे वगळता उर्वरित सर्व दावे निकाली काढण्यात आले आहे.  मात्र या 4 प्रकरणात सादर केलेले प्रमाणपत्र हे जरी वैद्य असले तरी या उमदेवारांच्या जमिनी प्रकल्पासाठी संपादित न केल्याच्या माहितीची खातरजमा करण्यासाठी संबं...

बीड शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा - अशोक तावरेदोन दिवसात मनसे स्टाईल आंदोलन करणार

Image
बीड (प्रतिनिधी) दि. 24 बीड  शहरातील लॉकडाऊन शिथिल झाल्या मुळे काही व्यवहार सुरळीत चालू झाले आहेत व सध्या सणासुदीचे दिवस आहेत त्यामुळे मार्केट मध्ये लोक खरेदीसाठी येत आहेत यामध्ये मोकाट जनावरे त्यातील काही वळू लाल वस्त्र परिधान केलेल्या महिलांच्या अंगावर धावून जात आहेत त्यामुळे बाजारात प्रचंड गोंधळ उडतो शहरातील प्रत्येक रस्त्यावर शंभर ते दीडशे च्या वर संख्येने ही मोकाट जनावरे फिरता व काही जनावरे बसलेले असतात त्यामुळे नगर पालिका प्रशासनाच्या वतीने दोन दिवसात या बाबतीत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी आज नगरपालिक येथे जाऊन  मुख्यअधिकारी उत्कर्ष  गुट्टे यांना निवेदन देन्यासाठी गेले होते  परंतु मुख्य अधिकारी हे त्यांच्या कक्षामध्ये उपस्थित नव्हते, हे निवेदन कशप्रमुख यांना दिले, पण  त्यांनी सांगितले की मुख्याधिकारी  हे पाच सहा  महिन्या पासून नगरपालिके च्या कार्यालयाकडे आलेले नाहेत, आपण निवेदन हे आवक-जावक  करावे अशी त्यांनी माहिती दिली. मुख्य अधिकारी घरूनच कामकाज पहातात, महाराष्ट्र नवनिर्माण सेना बीड जिल...

चलो पंढरपूर विठूरायाच्या दर्शनाला - ज्ञानेश्वर कोठेकर

Image
बीड (प्रतिनिधी) दि.24 वारकरी संप्रदायाने लॉकडाऊन विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे  करोना संक्रमणामुळे गेल्या चार पाच महिन्यापासून  बंद असलेले विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुली करण्यासाठी 31 अॉगस्ट रोजी विश्व वारकरी सेनेनं एक लाख वारकऱ्यांसोबत मंदिर प्रवेशासाठी आंदोलन करणार आहेत या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे करणार आहेत. करोना संसर्गामुळे गेल्या चार पाच महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे याचा फटका सर्वांना बसला आहे राज्यात मिशन बिगिन अंतर्गत अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले असेल तरी धार्मिक स्थळांना आणि सण- उत्सवांना तितकासा दिलासा मिळाला नाही यंदा आषाढीवारी प्रतिकात्मकरित्या साजरी करण्यात आली आषाढी याञेदिवशी पंढरपुरात वारकऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली  होती त्याशिवाय भजन किर्तनासही मनाई करण्यात आलेली आहे या सगळ्याच मुद्यावरून वारकरी संप्रदाय नाराज आहे याच नाराजीच्या स्फोट म्हणून वारकऱ्यांनी एक लाख वारकरी घेऊन  पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरात प्रवेश करणार आहेत या वारकऱ्यांच्या आंदोलनाला वंचि...

अखिल भारतीय सफाई मजदूर च्या वतीने होणाऱ्या लाक्षणिक उपोषणाला जाहीर पाठिंबा - विजेंद्रसिंग डुलगच

Image
बीड (प्रतिनिधी) दि.25  मराठवाडा अध्यक्ष भारतीय बाल्मीकी समाज बीडच्या वतीने येत्या 27 ऑगस्ट तारखेला अखिल भारतीय सफाई मजदूर च्या होणाऱ्या लाक्षणिक उपोषणला जाहीर पाठींबा विषय बाल्मीकी समाजा वरती कारवाई  न बाबत कारण आहे .वराह व्यवसाय बंदिस्त करून पालन करणे नसता महानगरपालिका ज्यांचे वराह आहेत .त्यांच्यावर कारवाई करू असे आदेश आहेत.परंतु अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस तर्फे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विजेन्द्र टाक यांनी महानगरपालिका औरंगाबाद यांना एका निवेदनाद्वारे वराह व्यवसाय सुरू करण्या करता मनपा ने या लोकांना जागा उपल्बध करून द्यावी. नसता मनपा समोर लाक्षणिक उपोषण करण्यात येईल. असे निवेदनात म्हटले आहे. या मागणीला मी मराठवाडा अध्यक्ष भारतीय बाल्मिकी समाजात तर्फे जाहीर करतो आहे ची ;या मागणीचे विचार करावे ही विनंती  वजा आंदोलनाचा इशाराही दिला आहे .असे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात अखिल भारतीय बाल्मिकी समाज संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विजेंद्रसिंह डुलगच यांनी म्हटले आहे.

परळी पंचायत समितीचे प्रांगण बहरले घनदाट वृक्षलागवडीनेतालुक्यातील ग्रामपंचायतीने हा वृक्षलागवडीचा आदर्श घ्यावा-संजय केंद्रे

Image
परळी वै. (प्रतिनिधी) :- परळी  पंचायत समितीच्या प्रांगणात लावण्यात आलेल्या घनदाट वृक्ष लागवडीने प्रांगण बहरले असून वृक्षांची सरासरी आठ ते दहा फुटापर्यंत उंची गाठली आहे. हिरव्यागार घनदाट या वृक्षामुळे पंचायत समितीला वेगळे आकर्षण निर्माण झाले असून अशा प्रकारची वृक्ष लागवड तालुक्यातील 29 ग्रामपचायंतीने केली आहे. हाच आदर्श इतर ग्रामपंचायतीने सुध्दा घ्यावा असे आवाहन परळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनी केले आहे. शहरातील पंचायत समितीच्या प्रांगणात चार गुंठे क्षेत्रात एकुण बाराशे झाडांची लागवड ऑक्टोंबर 2019 मध्ये करण्यात आली होती. यामध्ये अंबा जांभूळ, चिंच, आव्वाळ, साग, पिंपळ, वड, चाफा, तुळस शेवगा, कडुनिंब, बाबु, बकळु, शिरु, कांचन आदीं बावीस प्रकारच्या झाडांची घनदाट लागवड करण्यात आली आहे. यासर्व वाढलेल्या झाडांची मााहिती स्वत: गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनी दिली. याप्रसंगी पंचायत समितीचे सदस्य जानिमियॉं कुरेशी, ज्येष्ठ पत्रकार रानबा गायकवाड व महादेव गित्ते उपस्थित होते. यावर्षांच्या लागवड केल्यानंतर त्यांचे संगोपन व संरक्षण करण्यासाठी तसेच लावलेल्या सर्व ...

होलार समाजातील कुटुंबावर जीवघेणे हल्लाॲट्रॉसिटी सिटी चा गुन्हा दाखल करा होलार समाजाची मागणी मागणी

Image
होलार समाजातील कुटुंबावर जीवघेणे हल्ला ॲट्रॉसिटी सिटी चा गुन्हा दाखल करा होलार समाजाची मागणी मागणी सोनपेठ (प्रतिनिधी) -: पोहडूंळ तांडा येथील हाल्ली मुकाम रहिवासी मनोहर कुशेबा आवळे यांच्या कुटुंबात पत्नी आई वडील व त्यांचे लहान मुले यांना बेशुद्ध होईपर्यंत गाव गुंडांकडून मारहाण एका दिवशी त्यांची पत्नी तांड्यातील सार्वजनिक हापसावर पाणी भरायला गेली असता तांड्यातील काही विशिष्ट लोकांनी धेडंयानी,महारांनी व्हलग्यानी आमच्या हापसावर पाणी भरायचे नाही  असे म्हणून मनोहरच्या पत्नीला जाती शिवीगाळ करत अश्लील भाषेचा वापर करत शिव्या दिल्या.  मनोहर त्यांना विचारण्यास गेला असता. त्यालाही जातीवाचक शिवीगाळ करत बंजारा समाजातील चार चौघांनी मिळून लाठ्याकाठ्यानी तुझे गावात एकच घर आहे. आम्ही तुला जिवंत मारू अशा धमक्या देत मारहाण केली. सर्व कुटुंब भयभीत होऊन सोनपेठ येथील पोलीस ठाण्यात फिर्याद द्यायला गेले असता तेथील पोलीस उपनिरीक्षकउपनिरीक्षकapl भातलंवडे यांनी 18ct कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंद होता तसे महिलांची छेड काढली असताना , आरोपीवर विनयभंगाचा न गुन्हा नोंदवता कलम ३२४ , ३२३ अस...

पंढरपुरात आंदोलनाची तयारी करा, बाळासाहेबांनी शासनाला दिला अखेरचा इशारा

Image
मुंबई, दि.२५ - राज्य सरकारने ३१ ऑगस्ट पूर्वी पंढरपूरचे मंदिर खुले केले नाही तर त्या ठिकाणी वारकरी, महाराज यांच्यासह लाखो लोकांच्या मदतीने आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे शासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.  वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर राज्यातील एसटी, बस सेवा चालू करण्यात आली. पानटपऱ्या केस कर्तनालाय यांची दुकाने व इतर व्यवसाय सुरू झाले. मात्र मंदिर अद्यापही बंद आहेत. शासनाला इशारा दिलेला आहे ३१ ऑगस्ट पूर्वी पंढरपूरचे मंदिर खुले झले नाही तर लाखो वारकरी ३१ ऑगस्ट रोजी मंदिर प्रवेश करतील. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे आवाहनही ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. 

परळी ग्रामीण पोलीसांनी घेतले गाढवालाच ताब्यात!पोलीसांनी लावलेले झाड खाल्ले म्हणून कारवाई,

Image
परळी वै.(प्रतिनिधी) -: खरं तर गुन्हेगाराला आणि त्यातही माणसाला अटक करण्याचे पोलिसांचे काम... पण आता चक्क पोलीस गाढवालाही ताब्यात घेऊन कारवाई करू लागले. परळी ग्रामीण पोलीसांनी एका गाढवाला ताब्यात घेऊन बांधून टाकले नंतर चूक लक्षात आल्यानंतर गाढवाला सोडून देण्यात आले. या प्रकाराची चवीने चर्चा केली जात आहे. याचे झाले असे की, परळी ग्रामीण पोलीसांनी पोलीस ठाण्याच्या परिसरात काही दिवसांपूर्वी वृक्ष लागवड करण्यात आली. झाडेही बर्‍यापैकी आले. मात्र आज एका गाढवाने यापैकी एक झाड खाल्ले. पोलीसांनी लावलेले झाड खाने म्हणजे मोठा गुन्हाच! गाढवाने झाड खाल्ल्याचं समजताच पोलीसांनी संबंधित गाढवाला ताब्यात घेऊन डांबुन टाकले. एव्हढेच नव्हे तर त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी एका जमादाराची नियुक्तीही करण्यात आली. पोलीसांनी गाढवाला ताब्यात घेतल्याची बातमी शहरात पसरली आणि आश्चर्य व्यक्त केले जाऊ लागले. ही चर्चा शहरात पसरल्यानंतर काही कार्यकर्ते चक्क गाढवाची जमानत घेण्यासाठी पोलीसात गेले. आपली गफलत झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीसांनी गाढवाला सोडून दिले मात्र हा विषय बराच चर्चेत होता.

शैक्षणिक संघर्ष योद्धा - प्रो. डॉ. शंकर अंभोरे

Image
प्रो.डॉ. शंकर अंभोरे  यांचा जन्म 25 ऑगस्ट 1966 रोजी, वाशीम जिल्हा, रिसोड तालुक्यातील पर्डी तिखे या छोट्याश्या गावी झाला. आपण आपले 10 वी पर्यंतचे शिक्षण आपल्या गावी पूर्ण करुन पुढील शिक्षण घेण्यासाठी ज्ञानभूमी म्हणजेच नागसेनवन औरंगाबाद येथे आले असता शिक्षण घेत घेत आपला शैक्षणिक व  सामाजिक संघर्षास सुरुवात झाली. आपण आपले पदवी पर्यंतचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वाणिज्य शाखेतून पूर्ण करून पुढील पदव्युत्तर शिक्षण एम. ए. अर्थशास्त्र या विषयात पूर्ण केले. पुढे आपण एम.ए. अर्थशास्त्रात एम. फिल. व पी. एच. डी. चे शिक्षण पूर्ण केले.आपली 1992 या वर्षी जालना येथील श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली व आपण मागील 28 वर्षांपासून अध्यापनाचे व संशोधनाचे कार्य करीत आहात. आपण आजपर्यंत एकूण 15 विद्यार्थ्यांना संशोधनाचे मार्गदर्शन केले आहे तसेच, आपले मायनर व मेजर असे एकूण 6 राष्ट्रीय स्तरावर संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत तर आपले 100 पेक्षा जास्त रिसर्च पेपर हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित आहेत.  आपण 700 पेक्षा जास्त रा...

भारतीय संविधाना चा अवमान करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - ऑल इंडिया पँथर सेनेची निवेदनाद्वारे मागणी

Image
परळी (प्रतिनिधी) - : आज ता. परळी जि.बीड पोलीस स्टेशन परळी शहर येते निवेदनाद्वारे  संविधानाचा अवमान करणाऱ्या समाजकंटक प्रवीण तराडे याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे,  समाजकंटकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,   बाबासाहेबांनी संविधानाच्या रूपातून सर्व जाती-धर्माला न्याय देण्याचे काम केले आहे,   संविधान हे एका जातीपुरते मर्यादित नसून सर्व जाती-धर्माच्या लोकांचा प्राण आहे, संविधानाच्या माध्यमातून देशात समता,स्वतंत्र ,बंधुभाव नांदते याला तडा देऊन देशामध्ये समाजामध्ये तेड निर्माण करण्याचा षंडयंञ करत असलेल्या .आश्या समाज विघातकाला आळा बसायला पाहिजे.  चूक करायची आणि माफी मागायची हे दिवसेंदिवस चालूच राहिलेला आहे आश्याना आळा घालण्यासाठी आश्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, आशि मागणी अॉल इंडिया पँथर सेनेच्या माध्यमातून  करण्यात आली . त्या वेळेस ऑल इंडिया पँथर सेनेचे परळी ता.अध्यक्ष आकाश तुपसमुद्रे, परळी ता.महासचिव विनोद घुंबरे,परळी शहर सचिव संविधान आदोडे, बीड जिल्हा सदस्य सिद्धांत जोगदंड, पँथर सदस्य अभिषेक कांबळे इ.उपस्त...

होम क्वारंटाईन असलेला पाॕझिटिव्ह रुग्ण बाहेर आढळुन आल्यास गुन्हे दाखल होणार - तहसीलदार विपीन पाटिल

Image
परळी (प्रतिनिधी) :- परळी शहर व तालुक्यातील होम क्वारंटाईन असलेले कोरोना रुग्ण नियमाचे उल्लंघन करत घरा बाहेर पडत असल्याच्या तक्रारी मिळत असल्याने तालुका प्रशासन अश्या रुग्णावर कडक पाळत ठेऊन गुन्हे दाखल करणार असल्याचे तहसीलदार विपीन पाटिल, गटविकास अधिकारी संजय केंद्रे,मुख्याधिकारी अरविंद मुंडे,वैद्यकीय अधिक्षक डॉ दिनेश कुरमे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे,पोलिस निरिक्षक हेमंत कदम,पोलिस निरिक्षक बाळासाहेब पवार यांनी कळवले आहे. परळी शहर व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशान्वे परळीतील आरोग्य प्रशासन व महसुल प्रशासनाने त्याचे नियोजन करुन व्यापारी कामगार व कंटेन्मेट झोन मधील नागरिकांचे स्वॕब व रॕपीड अॕन्टीजन टेस्ट मोठ्या प्रमाणात घेतल्या गेल्यामुळे केवळ शहरात तब्बल 348 कोरोना पाॕझिटिव्ह रुग्ण आढळुन आले आहेत. शासनाने दरम्यान निर्गमित केलेल्या आदेशामुळे पाॕझिटिव्ह रुग्ण जर होम क्वारंटाईन स्वताः होणार असेल तर काही अटी घालुन दिल्या आहेत.जसे कि पाॕझिटिव्ह रुग्णाला जर आपल्या घरीच होम क्वारंटाईन व्हायचे असेल त्यांच्या घरात स्वतंत्र रुम...

बालासाहेब इंगळे यांच्या निवेदनाची ना.धनंजय मुंडे यांनी घेतली दखल

Image
परळी (प्रतिनिधी) -: जुनी पेन्शन कोअर कमिटी औरंगाबाद विभाग व बीड जिल्हा यांच्या वतीने बालासाहेब इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व 10 जुलै 2020 ची अधीसुचना रद्द करावी अशा मागण्यांचे निवेदन दिले होते या निवेदनाची दखल घेत ना. धनंजय मुंडे यांनी शालेय शिक्षण मंत्री यांनी याबाबत योग्य कार्यवाही करावी यासंदर्भात सांगितले आहे एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व नंतर प्रशासनाने शंभर टक्के अनुदान दिलेल्या शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी यासंदर्भात संघटनेच्या वतीने ना. धनंजय मुंडे यांना निवेदन दिले होते या निवेदनाची दखल घेत ना. धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांना योग्य ती कार्यवाही करावी व निर्णय घ्यावा अशा प्रकारची शिफारस केली आहे यामुळे संघटनेच्यावतीने ना.धनंजय मुंडे यांचे आभार मानण्यात येत असल्याचे बालासाहेब इंगळे,मधुकर घुगे,चंद्रकांत गायकवाड, संजय इंगळे,मदन कराड,श्रीहरी दहिफळे,विलास धीमधीमे,बन्सी पवार,गोरखनाथ राऊत,बाळासाह...

परळी शहर पोलीस ठाण्याचा हद्दीतील महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटपवरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.आरती जाधव यांनी घेतला पुढाकार

Image
परळी वै.(प्रतिनिधी) -: परळी  शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मेडिकल दुकानेही बंद ठेवण्यात आली असून घराबाहेर पडण्यास प्रशासनाने मज्जाव केलेला आहे. अशा स्थितीत महिलांच्या मासिक पाळीतील आरोग्याला बाधा पोचण्याचा अनेक शक्यता निर्माण झाल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोदार, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या आदेशाने व पोलीस निरीक्षक हेमंत कदम व सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत सॅनिटरी पॅड वाटप मोहीम राबविण्यात आली. मासिक पाळी ही स्त्रियांच्या जीवनातील नाजूक अवस्था असते, या काळात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक बाब आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने संपूर्ण शहर लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. रुग्णालय संलग्नित मेडिकल दुकाने वगळता इतर सर्व मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झालेले आहे. चूल ...

रिमझिम पावसामुळे डिघोळ येथील मुख्य रस्ता चिखलमय

Image
सोनपेठ (प्रतिनिधी) -: तालुक्यातील डिघोळ येथील गावात प्रवेश करणाऱ्या  मुख्य रस्त्याची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. गावातून शहराला जात असताना नागरिकांना चिखला मधून वाट शोधावी लागत आहे.  सततच्या रिमझिम पावसामुळे मुख्य रस्ता चिखलमय बनल्याचे बघायला मिळत आहे. मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्याची ही दुरवस्था झाल्याची दिसून येत आहे.  नागरिकांना कामाला ये-जा करण्यासाठी मोठी काटे वरची कसरत करावी लागत आहे.  गावातून  शहरात  हॉस्पिटल आणि कामाकरता करता जात असताना. दुचाकीवर तर पायी या चिखलातून रस्ता शोधत नागरिकांना जावे लागत आहे रात्री-अपरात्री काही अपघात या रस्त्यावरती होऊ नाहीत. म्हणून प्रशासनाने खबरदारी घेऊन या रस्त्याची दुरुस्तीचे काम लवकरात लवकर हाती घ्यावे. अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

एकाच घरात दोन घरकुल मंजुर करणार्या ग्रामसेवक व सरपंचावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करूण ग्रामसेवकाला निलंबीत करा - युनुस शेख

Image
बीड (प्रतिनिधी) दि.21 बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील खेेड्यागावात एकाच घरात दोन वेळा घरकुल मंंजुर करण्याचे काम सरपंचा सोबत संगणमत करूण ग्रामसेवक करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे बीडचे तालुकाध्यक्य युनुस शेख यांनी केला आहे.खेड्यागावात अनेक कुटुंब हे शासनाच्या घरकुल योजने पासुन वंचित असुन गोर गरीब कष्टकरी,शेतमजुरांना अद्याप हि लाभ मिळालेला नाही.सरपंच व ग्रामसेवक गावातील जवळच्या व संपर्कातील लोकांकडुन चिरी-मिरी घेऊन एकाच घरातील दोन व्यक्तींना घरकुलाचा लाभ देत असुन या मध्ये सर्व सामान्य कुटुंबीयांना मात्र घरकुला पासुन बेघर व्हावे लागत आहे.तरी सरपंच व ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारामुळे गोर गरीब नागरकांची दयनिय अवस्था होत आहे.तरी मुजोर ग्रामसेवकाच्या आडमुठ्या धोरणाचा जिल्हाधिकारी बीड यांनी समाचार घेऊन त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करूण अशा बेजबाबदार ग्रामसेवकांवर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करावी व सर्वसामान्य नागरीकांना घरकुलाचा लाभ मिळवुन देण्यात यावा नसता वंचित बहुजन आघाडी बीड तालुक्याच्यावतीने बेजबाबदार ग्रामसेवकाच्या चुकीच्या धोरणा विरूद्ध तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्य...

डिजिटल ऑनलाइन पद्धतीने "मेरा भारत - माझा अभिमान" या देशभक्तीपर उपक्रमातून तुलसीच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला स्वातंत्र्यदिन....

Image
बीड (प्रतिनिधी) -: देवगिरी  प्रतिष्ठान संचलित,  तुलसी इंग्लिश स्कूल बीड येथे संस्थेचे संस्थापक तथा संचालक प्रा. प्रदिप रोडे  यांच्या संकल्पनेतून प्रेरणा घेत माननीय प्राचार्या उमा जगतकर यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षीचा 15 ऑगस्ट 2020  - "स्वातंत्र्य दिन"  हा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला... यावर्षीचा स्वातंत्र्यदिन हा विद्यार्थ्यांनी घरातच राहून ऑनलाइन पद्धतीने साजरा केला.... यात विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या मदतीने वेगवेगळ्या विविध कलागुणांना सादर करण्याची संधी मिळाली.. ज्यात देशभक्तीपर गीत गायन, रांगोळी, नृत्य, चित्रकला, भाषण, आधुनिक देशभक्तीपर रॅप गीत, अभिनय, मेहंदी काढणे, फॅन्सी ड्रेस आदी माध्यमातून आपली कलागुण सादर करण्याचा आणि देशाला अभिवादन करण्याचा विशेष अभिमान मिळाला... ज्यातून विद्यार्थ्यांना देश कळाला या ऑनलाईन सांस्कृतिक उपक्रमांत जवळपास शाळेतील पावणेदोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला व एक विक्रम केला. .. ज्यात नर्सरी ते दहावी मधील विद्यार्थी सहभागी होते.खरंच या लॉकडाऊन च्या काळा मध्ये देशाला अशा प्रकारे अभिवादन करण्याची एक वे...

खबरदार! स्वॅब‌ देण्यास टाळाटाळ केल्यास गुन्हे दाखल होणार

Image
बीड (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे थ्रोट स्वॅब‌ तपासण्यात येतात. परंतु काही महाभाग स्वॅब‌ देण्यास आणि तपासणीस टाळाटाळ करत असल्याचे अनुभव सातत्याने येत असल्याने अशा व्यक्तींवर कायदेशीर बडगा उगारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आता स्वॅब देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कार्यवाही करून गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिला आहे.  बीड कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्रशासनामार्फत प्रसार थांबविण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून बाधित रुग्णांच्या घनिष्ट संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन विलगीलकरण करून आवश्यकतेनुसार त्यांची कोरोना तपासणी केली जाते. यासाठी त्या व्यक्तींना आरोग्य यंत्रणेमार्फत संपर्क करून जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये स्वॅब तपासणीसाठी वेळ व दिनांक निश्चित केला जातो. मात्र, काही व्यक्ती विविध कारणे देऊन स्वॅब‌ देण्यास आणि तपासणीस टाळाटाळ करतात. दिशाभूल करणे, चुकीचा पत्ता देणे, फोन बंद करून ठेवणे तसेच ...

विघ्नहर्त्याच्या आगमनाने कोरोनाचे मळभ दूर व्हावे - धनंजय मुंडे गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा देत कोरोनाविषयक खबदरदारी घेण्याचे केले आवाहन

Image
परळी (दि. २१) - : विघ्नहर्ता श्रीगणेशाच्या आगमनाने जगावरील कोरोनाचे मळभ दूर व्हावे अशी प्रार्थना श्रीगणेशाला करत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा वासीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच गणेशोत्सवादरम्यान शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करत कोरोनाविषयी खबरदारी घ्यावी असे आवाहनही केले आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा व सबंध राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा उत्सव;कोरोनाच्या सावटाखाली या वर्षी अत्यंत साधेपणाने सर्वत्र साजरा केला जात आहे. गणेशोत्सव काळात कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यादृष्टीने राज्य व जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच सार्वजनिक गणेश मंडळांना देखील आवश्यक परवाने काढण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यात एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार सार्वजनिक गणेश मंडळांनी देखील रीतसर परवानगी घेऊन व सर्व नियमावलीचे पालन करून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा असे ना. मुंडे यांनी म्हटले आहे. प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळांनी सॅनिटायझर आदींची व्यवस्था करून ठेवावी तसेच दर्शनाला येणाऱ्या नागरिक...

नाथ प्रतिष्ठानचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने होणार साजरा, धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्या होणार श्रींची स्थापना

Image
परळी (दि. २१) - : ना. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त मोंढा मैदान येथे उद्या (शनिवारी) दुपारी तीन वाजता ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते विधिवत पूजा व आरती करून श्रीगणेश स्थापना करण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रादूर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम साजरे करून केला जातो. नाथ प्रतिष्ठान च्या गणेशोत्सवाची सबंध राज्यभरात ख्याती आहे.  परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने नाथ प्रतिष्ठान तर्फे गणेशोत्सव साजरा केला जात आहे. श्रींची स्थापना, विधिवत पूजा व आरती पारंपरिक मोंढा मैदान येथे ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते दुपारी ठीक तीन वाजता कोविड विषयक सर्व खबरदारी व नियमांचे पालन करून करण्यात येईल, गणेशोत्सवादरम्यान काही सामाजिक उपक्रम राबविण्याबाबत मंडळ विचार करत आहे अशी माहिती परळी नगर परिषदेचे ग...

भारतरत्न, संगणक जनक माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांचे विचार देशाला तारणारे - वसंत मुंडे

Image
परळी(प्रतिनिधी) -: संगणक जनक भारतरत्न भारताचे आधुनिक शिल्पकार माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची परळी काँग्रेसच्या वतीने व सर्व विभागाच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमास काँग्रेसचे नेते  वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार यांनी मार्गदर्शन केले .या कार्यक्रमास परळी शहर काँग्रेस अध्यक्ष बाबु भाई नंबरदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणपत आप्पा कोरे विश्वनाथ गायकवाड दत्तात्रय मुळे अँड संजय रोडे सय्यद अल्ताफ जब्बार शेठ शेख सिकंदर लहू दास तांदळे रामलिंग नावंदे संदीप शिंदे तालुका अध्यक्षा सुनिता मुंडे शहराध्यक्ष आशाताई कोरे राहुल भोकरे इत्यादी उपस्थित होते.

परळी नगरपालिकेच्या रोजंदारी मजुरांचा आरोग्य विमा भरण्यात यावा - बालासाहेब जगतकर

Image
परळी (प्रतिनिधी) -: परळी नगरपालिकेच्या रोजंदारी मजुरांचा आरोग्य विमा भरण्यात यावा अशी मागणी साप्ताहिक मानपत्र चे संपादक तथा  तक्षशिला बहुउददेशिय सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब जगतकर यांनी केली आहे.            याबाबत सविस्तर माहिती अशी कि सध्या कोरोना वायरस मुळे पूर्ण परळी नगरपरिषदेचे रोजंदारी मजुर हे जेव्हा पासुन कोरोना वायरस सुरू झाला तेंव्हा पासुन आजपर्यंत परळी शहरातील स्वच्छतेची व जनतेच्या आरोग्याची काळजी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता कायमस्वरुपी कर्मचारी यांच्या बरोबरीने काम करीत असुन जेव्हा हि अधिकारयाचे बोलावणे येतिल तेव्हा हजरच असतात ते ही तुटपुंज्या पगारावर. त्या साठी या मजुरांचा आरोग्य विमा यासह त्यांना आरोग्य किट जसे हाथमोजे ,मास ,गमबुट ,सॅनेटायझर, आरोग्य वरधक औषधोपचार अश्या विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यात याव्यात अशीही मागणी साप्ताहिक मानपत्र चे संपादक तथा तक्षशिला बहुउददेशिय सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब जगतकर यांनी केली आहे.

औरंगाबाद वंचित बहुजन आघाडीची.पहिली प्रवास यात्रा एस.टी. ची

Image
औरंगाबाद, दि.२० -  राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करावी, यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात डफली बजाओ आंदोलनाची हाक दिली होती. १२ ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्यात आले. सरकारला या आंदोलनापूढे नमते घेत एसटीला जिल्हा अंतर्गत चालू करण्याची परवानगी द्यावी लागली.   कोरोनाच्या साथीमुळे जनसामान्यांचे जीवन विस्कळीत झालेले आहे. सर्व व्यवहार व वाहतुक कोलमडलेली आहे. गोर-गरीब व जनसामान्यांची एस टी वाहतूक बंद झाल्यामुळे त्यांचे अतोनात हाल झाले. मात्र आता कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव राहिला नसल्याने त्यातच खासगी वाहतुकीला राज्यात परवानगी दिली असल्याने सर्वसामान्य लोकांच्या एसटीला ही परवानगी देण्यात यावी, त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर डफली बजाव आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनाला भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शासनाने योग्य निर्णय घेऊन गरीब जनतेला व सामान्य जनतेला मोठा दिलासा देत राज्यात एसटी ला परवानगी दिली. या पुढे ही महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग तसेच सर्व कर्मचाऱ्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असेल,अस...

' मोक्का' ची प्रकरणे आता जिल्हा न्यायाधीश चालविणार( डी जे-1व डी जे-2 यांना अधिकार केले प्रदान )अॅड. रणजित वाघमारे अतिरिक्‍त सरकारी वकील माजलगाव यांची नियुक्ती

Image
बीड (प्रतिनिधी)दि. 20 विशेष मोका कोर्टावर करण्यात आली आहे.  सध्याते माजलगाव येथे अतिरिक्त सरकारी वकील म्हणुन काम करत आहेत, तेथे त्यांच्या कामाची नेहमी प्रशंसा ऐकण्यात आली आहे. ते योग्य न्याय या पदाला देतील. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.                  राज्यातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मोका (MOCCA)कायद्याच्या अंतर्गत येणारी प्रकरणे आता राज्यातील प्रत्येक जिल्हा न्यायालयात चालविण्यात येतील .आतापर्यंत हे खटले केवळ विशेष न्यायालयात चालविली जात असत.            संघटित गुन्हेगारी वर नियंत्रण मिळविण्यासाठी  1999 मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा( Maharashtra Control Of Organised Crime Act ),1999 अस्तित्वात आला होता. हा कायदा ' मोक्का ' या नावाने ओळखला जातो. राज्यातील वाढत्या संघटित गुन्हेगारीवर व प्रामुख्याने त्या काळात वाढलेल्या आतंकवादी कारवायांविरोधात हा कायदा तत्कालीन शिवसेना-भाजपा राज्य सरकारने आणला होता.      अ...

बीड वंचित बहुजन आघाडी वतीने सेवेतील एसटी वाहक- चालक यांचा सत्कार संपन्नबीड -औरंगाबाद, बीड-नांदेड, बीड-लातूर गाडीच्या चालक- वाहकांचा सत्कार...

Image
बीड (प्रतिनिधी) दि. 20 वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांनी 12 तारखेला महाराष्ट्रातील सर्व बसस्थानका समोर डफली बजाओ आंदोलन चालू केले होते सार्वजनिक वाहतूक चालू करावी या मागणीची दखल घेत आज राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या बसेस जिल्ह्या बाहेर चालू केले आहेत याची दखल घेत बीड येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बीड येथील आगारांमध्ये आगार प्रमुख निलेश पवार, स्थानक प्रमुख किरण बनसोडे आयटीआय संतोष जाधव, मिलिंद ससाने कर्तव्यावर जाणारे वाहक शकील भाई चालक भोसले वाहक गोरे वाहक-चालक व स्थानक प्रमुख कर्मचाऱ्यांचे पुष्पहार शाल श्रीफळ पुष्पहार घालून देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी वंचित बहुजन आघाडी विधानसभेचे उमेदवार अशोक हिंगे ज्येष्ठ नेते बबन वडमारे, महिला आघाडीच्या नेत्या पुष्पाताई तुरुकमाने, उपाध्यक्ष संतोष जोगदंड, ज्ञानेश्वर कवठेकर,अजय सरवदे, ॲड. सदानंद वाघमारे, बालाजी जगतकर, विनोद तागडे, युनुस शेख आधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बीड बस स्थानकात कर्तव्यावर आलेल्या सर्व  वाहक-चालक कर्मचाऱ्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले.

बीडचा आमदार व बीडचा नगराध्यक्ष यांच्या घरापुढे "रस्ता खोदो" आंदोलन करणारः - पँथर धम्मानंद वाघमारे

Image
बीड (प्रतिनिधी) दि.20 बीड शहरातील नाळवंडी रोड प्रभाग क्रमांक 19 व 4 मधील रस्त्याची दुरावस्था अशी झाली आहे की माणूस सोडा जनावरांना देखील  या रस्त्यावर चालू शकत नाहीत. आदित्य मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज कडे जाणारा हा प्रमुख रस्ता आहे, कोरोना रोगामुळे जिल्हा आरोग्य विभागाचे काही विभाग या भागातच चालू करण्यात आले आहेत जवळचा रस्ता म्हणून शहरातील सर्व भागातील लोक  या रस्त्याचा उपयोग करत आहेत वाहतूकीचा असलेला हा रस्ता खड्डे व घाणीचे साम्राज्य झाला असून या भागात राहणाऱ्या लोकांचे हाल होत आहे. ये-जा करण्याची देखील हाल होत आहेत, साथिच्या रोगांनी थैमान घातलेला असताना जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष का केले जातेय. जनतेतून निवडून आलेले स्वतःला बीड चे भुषण समजणारे बीडचे नगर अध्यक्ष या भागाचे भुषण म्हणून घेतील का ? असा सवाल मी त्यांना करत आहे! या भागातील जनतेचे सेवक असलेले प्रतीनिधी आपल्या बंगल्याच्या बाहेर निघत नाहीत आणि प्रभागातिल अडचणी नगराध्यक्षाच्या निदर्शनास आणून देण्याची यांची हिम्मत नाही असा माझा आरोप आहे. हे जनतेचे प्रतिनिधी आहेत का बंगल्याचे गडी. जर दोन दिवसात या रस्त्याचा...

"वंचित बहुजन आघाडी" च्या डफली बजाव आंदोलनास यश- राज्यांतर्गत आंतरजिल्हा ST बस सेवा सुरु करण्यास सरकारला भाग पाडले. - डॉ नितीन सोनवणे

Image
बीड (प्रतिनिधी)दि.19 सामान्य माणसाची जीवनरेखा असलेल बस सेवा चालू करण्यासाठी संपूर्ण राज्यभरात "वंचित बहुजन आघाडी" च्या वतीने.अॅड.बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात डफली बजाव आंदोलन करण्यात आले आणि सरकारला इशारा देण्यात आला की जर 15 ऑगस्ट पर्यंत याचा निर्णय न झाल्यास "वंचित बहुजन आघाडी" रस्त्यावर उतरेल. त्याचाच  धसका घेऊन राज्यात बस सेवा सुरु करण्यात येईल याचा निर्णय घेण्यात आला.  राज्यामध्ये भाजपा जवळ 105 आमदार असूनही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावताना दिसत नाही याउलट एकही आमदार नसताना सामान्य माणसासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा करणारी "वंचित बहुजन आघाडी" ही सक्षम विरोधी पक्षाची उणीव भरून काढत आहे. सामान्य माणसाच्या हिताचा नेहमी विचार करणारे अॅड. बाळासाहेब आंबेडकर आपणांस खूप खूप धन्यवाद.

फुले-शाहू-आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर म्हणत परळी शाखेच्यावतीने डाॅ. दाभोळकरांना अभिवादन!

Image
परळी (प्रतिनिधी) -: फुले-शाहू-आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर म्हणत परळी मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष शहीद डॉ.नरेंद्र दाभोळकर यांना परळी शाखेच्यावतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. आज डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला सात वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र तरी डाॅ. नरेंद्र दाभोळकरांचे अनुयायी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. एकीकडे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्याने देशभरात चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास पूर्ण होऊ न शकल्याने  सामाजिक कार्यकर्त्यांनी सीबीआयवर नाराजी व्यक्त केली करत या संदर्भात परळी शाखेच्या वतीने  ई-मेल द्वारे  पंतप्रधानांना, मुख्यमंत्र्याना निवेदन दिले आहे. यावेळी उपस्थित आणि शाखाध्यक्ष जी.एस सौदळे, शाखा उपाध्यक्ष प्रा. दास वाघमारे, जिल्हा कार्यकारणी वरील प्रा. विलास रोडे यांनी दाभोळकर यांच्या कार्यावर ती प्रकाश टाकतात आपले मनोगत व्यक्त केले. ते २० ऑगस्ट २०१३ रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली आज या घटनेला सात वर्ष पूर्ण होत आहेत. आधी या गुन्ह्य...

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल, परळीची NEET परिक्षा केंद्र म्हणून निवड; १३ सप्टेंबर रोजी होणार NEET परिक्षा

Image
परळी ( प्रतिनिधी )  देश पातळीवर मेडिकल प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या National Eligibility Cum Entrance Test NEET परिक्षेसाठी केंद्र म्हणून परळी वैजनाथ येथील दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलची निवड करण्यात आली आहे. संपुर्ण देशात NEET परिक्षेसाठी केवळ १५५ शहरांची निवड करण्यात आली आहे, ज्यामध्ये परळी वैजनाथ शहराचा समावेश आहे.  केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालया अंतर्गत National Testing Agency द्वारे दरवर्षी MBBS व BDS कोर्सेसना प्रवेशासाठी NEET परिक्षा घेतली जाते. परिक्षेची रचना CBSE कडून केली जाते तर प्रत्यक्ष परिक्षा घेण्याची जबाबदारी National Testing Agency ची असते.  २०१९ वर्षीच्या NEET परीक्षेला देशातून १४.१० लाख विद्यार्थी बसले होते. देशात वैद्यकिय व दंत महाविद्यालयात सुमारे ६६,००० जागा आहेत. म्हणजे एका जागेसाठी २० पेक्षा जास्त विद्यार्थी इच्छुक असतात.  NEET परिक्षा ७२० गुणांची असते. भौतिक शास्त्र १८० गुण, रसायन शास्त्र १८० गुण तर जैविक शास्त्र ३६० गुण असे वर्गीकरण असते. बीनचूक उत्तरास ४ गुण मिळतात तर चूक उत्तरास १ गुण वजा केला जातो. ...

दैनिक लोकदिशाचे मुख्य संपादक किशोर कागदे यांचा वाढदिवस साजरा

Image
बीड (प्रतिनिधी) -: दैनिक लोकदिशाचे मुख्य संपादक तथा उद्योजक व बीड रिपाईचे (A)जिल्हाध्यक्ष किशोर कागदे यांच्या वाढदिवसा निमित्त रोप व पुस्तक देऊन सत्कार करते प्रसंगी झी 24 न्यूज प्रतिनिधी चंद्रकांत कांबळे, दैनिक जय महाभारत चे प्रतिनिधी नितीन जोगदंड, दैनिक दिव्यअग्निचे जिल्हा प्रतिनिधी बालाजी जगतकर, दै.युवतीराज संपादक भागवत वैध,अनुरथ वीर,शेख युनुस,बळासाहेब कांबळे,आदी उपस्थित होते.

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

Image
परळी (प्रतिनिधी) -: तालुक्यातील कन्हेरवाडी येथील विष्णु गड संस्थानवरील भागवताचार्य कृष्णभक्त श्री ह भ प गणेश महाराज गुटटे यांच्या रसाळ वाणीतुन झी टाॅकिजवर कीर्तन मालिका सुरु आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन आणि सुरक्षेचे सर्व नियम पाळून,परळीतील श्री संत जगमिञ नागा महाराज मंदिर येथे झी टाॅकिजच्या कीर्तन मालिकेचे शूटिंग पार पडले,या अंतर्गत कासारवाडीचे भुमिपुञ श्री ह भ प गणेश महाराज गुटटे यांच्या पाच कीर्तनांचे शूटिंग झालेले आहे. त्याच कीर्तन सेवा दि 17 ऑगस्ट पासुन झी टाॅकिजवर "गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा "या कार्यक्रमात दररोज सकाळी 7 ते 9 यावेळेत प्रसारित होत आहेत. दि 17 रोजी-काय सांगु आता संतांचे उपकार,दि 18 रोजी-जाणे भक्तीचा जिव्हाळा आणि दि 19 रोजी-सत्य साच खरे या जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तनसेवा पार पडल्या असुन,अजुन दोन दिवस महाराजांची कीर्तने भाविकांना पहायला मिळतील. तीनही कीर्तनांना परळी तालुक्यातील भाविकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. भाविकांच्या प्रतिक्रिया सोसल मिडीया च्या माध्यमातून व्यकत होताना दिसत आहेत. महाराज...

कोवीड योद्धा डॉ संध्या लाटे यांची हेळसांड! डॉ. गवळी यांना निलंबित करा - बबन वाडमारे, संतोष जोगदंड मागणी

Image
बीड (प्रतिनिधी) दि.19 डॉ  संध्या लाटे या रायमोह ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत मेडिकल आॅफीसर म्हणुन कार्यरत आहेत. त्या सध्या कोव्हीड ड्युटीवर असुन कोंरटाईन वॉर्डात काम करीत आहेत. काल त्या पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांची तब्येत सिरीयस झाल्याने त्यांना बीड येथील लोटस हॉस्पीटल बीड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे नेते संतोष जोगदंड यांनी गवळी यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.  त्या ठिकाणी तेथील डॉ.ने पेशंट करोना पॉझिटीव्ह असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे सर्टिफिकेट मागितले. त्यानंतर पेशंटचे नातेवाईक यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गवळी यांना संपर्क केल्यानंतर मी ते देवु शकत नाही जी पॉझिटिव्ह रुग्णाची यादी आहे तीच दाखवा अशा प्रकारचे ऊत्तर देवुन भ्रमणध्वनी बंद करून टाकला. शेवटी आम्ही बीडचे सिव्हिल सर्जन डॉ  अशोक थोरात यांना संपर्क केल्यानंतर त्यांनी ते करोनान पॉझिटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र दिले त्यानंतर रुग्णावर उपचार सुरु झाले.                        ...

विद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी वयाच्या पात्रतेच्या अटीत सुट द्या –संतोष शिंदेराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्री यांना निवेदन

Image
परळी वै.(प्रतिनिधी) -: 2020 या वर्षात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक प्रकारच्या स्पर्धा परिक्षा रद्द झालेल्या आहेत किंवा त्यांच्या तारखा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. यामुळे संबंधीत परिक्षेस पात्र असलेले वय वर्ष २०२० या वर्षात उलटून जात असलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार असून, ही अट एका वर्षांसाठी शिथील करावी अशी मागणी परळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे यांना हे निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना या आजाराने आंतरराष्ट्रीय आपत्ती निर्माण झाली आहे. भारतात आणि आपल्या राज्यातही जनजीवन विस्कळीत झाले आहे. विविध स्वरूपाच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. करिअरची स्वप्नं उराशी बाळगून हजारो विद्यार्थ्यांनी जीवापाड मेहनत घेऊन परीक्षांची तयारी केली आहे. यातच कोरोनामुळे यंदा काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याने वयाच्या अ...

परळी उपजिल्हा रूग्णालयात मुबलक सुविधा उपलब्ध; कोरोना रूग्णांवर उपचारासाठी स्वतंत्र विभाग सुरू करा आरोग्य मित्रचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांचे जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांना दिले निवेदन

Image
परळी वै.(प्रतिनिधी) -: कोरोना  (Covid-19) या आजाराचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. बीड शहरानंतर परळी वैजनाथ शहरात रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक वैद्यकीय साधणं व औषधांची उपलब्धता परळी वैजनाथ येथील उपजिल्हा रूग्णालयात शासकीय निधीतून करण्यात आलेली आहे. १०० खाटांच्या रूग्णालयात १५ तज्ञ डॉक्टर्स, ६०-६५ जेष्ठ व अनुभवी परिचारीका, रक्त तपासणी प्रयोगशाळा व अन्य उपयोगी साधनं उपलब्ध आहेत. या गोष्टी लक्षात घेवून परळीच्या उपजिल्हा रूग्णालयात कोरोनाग्रस्त असलेल्या व अतिदक्षता विभागात ठेवण्याची आवश्यकता असलेल्या रूग्णांवर येथे उपचार करता येऊ शकतात ही बाब लक्षात आणून देत उपजिल्हा रूग्णालयात एक स्वतंत्र विभाग अतिसंवेदनशिल कोरोनाग्रस्त रूग्णांवर ईलाज करण्यासाठी तयार करावा अशी मागणी आरोग्य मित्रचे अध्यक्ष, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा नगरसेवक चंदुलाल बियाणी यांनी केली आहे.             सर्व सुविधा उपलब्ध असूनही १०० खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयात एकाही रूग्णावर उपचार केले गेले नाहीत. तथापि, बाहेरच्या काही शासकीय ईमारतींमध्ये वि...

रॕपीड अॕन्टीजन टेस्टचा आज दुसरा दिवस कोणत्या बुथवर कोणाची होणार टेस्ट

Image
परळी वै.(प्रतिनिधी) -: परळीत  रॕपीड अॕन्टीजन तपासणीची मोहिम काल पासुन सुरु करण्यात आली काल पहिल्या दिवशी 1321 नागरिकांनी आपली कोरोनाची तपासणी करुन घेतली यात 1254 जणांचा अहवाल अवघ्या पंधरा मिनिटांत जाहिर करण्यात आला आहे.1321 पैकी 67 नागरिकांचा अहवाल कोरोना पाॕझिटिव्ह आला आहे सरासरी 5 टक्के कोरोना बाधीत व्यक्ती आढळुन आले आहेत. आज बुधवारी शहरात लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंग मंदीर,सरस्वती विद्यालय,बस स्थानक व पंचायत समिती कार्यालय या चार बुथवर रॕपीड अॕन्टीजन टेस्ट घेतल्या जाणार आहेत. प्रशासनाने रॕपीड अॕन्टीजन टेस्टसाठी चार बुथवर व्यवस्था करण्यात आली असुन नागरिकांनी दिलेल्या वेळेत नेमवुन दिलेल्या बुथवर आपली तपासणी करुन घ्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक,तहसीलदार विपीन पाटिल,न.प.मुख्याधिकारी अरविंद मुंडे,वैद्यकीय अधिक्षक डॉ दिनेश कुरमे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे,नायब तहसिलदार बाबुराव रुपनर,तलाटी राजुरे,न.प.कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे,नोडल अधिकारी डॉ दिलीप गायकवाड आदी अधिकारी वर्गानी केले आहे. बुथ निहाय माहिती ——- बुथ लोकनेते गोपीनाथ राव मुंडे नटराज ...